death death
पुणे

अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीबाईंनी उघडले डोळे

बारामती तालुक्यातील मुढाळे येथील धक्कादायक प्रकार

चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर : कोरोनाबाधित आजीबाईंची प्रकृती खालावली...शरीर हालचाल करत नव्हते...डोळेही उघडत नाही...त्यामुळे आजींचे निधन झाल्याचे समजून नातेवाइकांना फोन केले. अंत्यसंस्काराची तयारीही झाली. मात्र, अचानक आजीबाईंनी डोळे उघडले...आणि पुन्हा सर्वांना आजी बरी असल्याचे कळवावे लागले.

मुढाळे (ता. बारामती) येथे सोमवारी (ता. १०) हा प्रकार घडला. ७६ वर्षांच्या या आजीबाईंनाना २० दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे आजीबाई विलगीकरणात होत्या. वृद्धापकाळामुळे शरीर प्रकृती साथ देत नव्हती. हालचाल करता येत नव्हती. त्यामुळे घरातील सदस्यांनाही सेवा कशी करावी, याबाबत कोडे पडले होते. संपर्कात जावे तर बाधा होईल, अशा भीतीमुळे थोडे अंतर राखून सेवा चालू होती.

मात्र, गेल्या दोन दिवसांत प्रकृती अधिक खालावली. आजीबाई डोळेसुद्धा उघडत नाहीत, हे पाहून घरातल्या सदस्यांनी बारामतीला दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. गाडी घेऊन जाताना आजीबाईंनी काहीच प्रतिसाद दिला नाही. दवाखान्यात ऍडमिट करावे; तर बेड शिल्लक नाहीत. अशा परिस्थितीत आजीबाई निपचित पडून राहिल्यामुळे गाडीतल्या सदस्यांना वाटले आजीचं निधन झालं. तेथूनच पाहुण्यांना फोन केले. निधन वार्ता कळवली. गाडी घरी आली आणि अंत्यसंस्काराची तयारी झाली. कोरोनाबाधित असल्यामुळे फार कोणी जवळ गेलं नाही. मात्र, आजूबाजूला नातेवाइकांची आर्त हाक ऐकून आजीबाईंनी डोळे उघडले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

कोरोनाच्या संसर्गामुळे एकमेकांना स्पर्श करणे धोक्याचं ठरत असल्याची भावना सर्वांच्या मनात घर करून बसल्याने असे प्रसंग ओढावत आहे. त्यात कोरोनाबाधितांचे अंत्यसंस्कार म्हणजे एक कोडंच झालं आहे. त्यातून लवकर विधी करून मोकळे व्हावं, अशा विचारातून आजीबाईंबाबत घाई अंगलट आली असती. जिवंतपणी सरणावर ठेवण्याच्या तयारीला कोरोनाची भीतीच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union History : ‘गोकुळ’ची स्थापना कधी झाली? आतापर्यंत किती अध्यक्ष झाले; पहिल्यांदाच चंदगडला अध्यक्षपदाचा मान, पाहा संपूर्ण यादी

Why Hardik Pandya leave Mumbai Indians : हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय का घेतला? वानखेडेवर जर्सी काढून फेकली अन्... Inside Story

Pune FDA Action: पुण्यात FDA ची कारवाई; दोन दुकांनाचे परवाने रद्द; 93 किलो मिठाई जप्त करून नष्ट

Pune News: वनदेवी टेकडीवरील आगीत नव्याने लावलेली झाडे होरपळली; वृक्षसंवर्धनाच्या प्रयत्नांना फटका

'लाज वाटली पाहिजे!' सीतेच्या अ‍ॅक्शन अवतारावर मुकेश खन्ना संतापले; दीपिका चिखलिया यांनीही उपस्थित केले सवाल

SCROLL FOR NEXT