Court Orders sakal
पुणे

Court Orders : नातवाचे करणार पंधरा दिवस लाड;कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशामुळे सात वर्षांनी होणार आजी-आजोबांची भेट

मुलगा आणि सुनेच्या वादात नातवाचे तोंडही पाहू न शकलेले आजी-आजोबा आता न्यायालयाच्या आदेशामुळे पंधरा दिवस त्याचे लाड पुरविण्याची हौस पूर्ण करू शकणार आहेत. तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या वाट्याला हे सुखाचे क्षण येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुलगा आणि सुनेच्या वादात नातवाचे तोंडही पाहू न शकलेले आजी-आजोबा आता न्यायालयाच्या आदेशामुळे पंधरा दिवस त्याचे लाड पुरविण्याची हौस पूर्ण करू शकणार आहेत. तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या वाट्याला हे सुखाचे क्षण येणार आहेत.

शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने आईकडील मुलाचा २० मे ते तीन जून दरम्यान वडिलांकडे ताबा द्यावा असा आदेश पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश के. ए. बागे-पाटील यांनी दिला. आपल्या मुलाला त्याच्या मुलाचा ताबा मिळणार असल्याने आजी-आजोबा नातवाला भेटू शकतील.

अशोक आणि रेखा यांचे ‘अरेंज मॅरेज’ झाले. अशोक चालक, तर रेखा उच्चशिक्षित आहेत. त्यांचा मुलगा पियुष (सर्व नावे बदललेली) सातवीत शिकतो. अशोक आणि रेखा कौटुंबिक वादामुळे वेगळे राहतात. पियुषचा ताबा आईकडे आहे. त्यामुळे आजी-आजोबा त्याला भेटू शकत नाहीत. पियुषच्या शाळेला सुट्टी असल्याने एका महिन्यासाठी त्याचा ताबा मिळावा म्हणून अशोक यांनी ॲड. गायत्री कांबळे यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता.

‘मुलाला भेटण्याचा मला हक्क आहे. परंतु पत्नी त्याला भेटण्यापासून जाणीवपूर्वक रोखते. माझे आई-वडील २०१७ पासून नातवाला भेटू शकलेले नाहीत. ते त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे मुलाचा तात्पुरता ताबा देण्यात यावा,’ अशी मागणी अशोक यांनी अर्जाद्वारे केली.

आई किंवा दाव्याबद्दल बोलायचे नाही...

न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. अशोक यांना वडील या नात्याने मुलाला भेटण्याचा समान हक्क आहे, असे नमूद करत न्यायालयाने हा आदेश दिला. या कालावधीत अशोक आणि त्याचे कुटुंबीय मुलाशी आईबद्दल किंवा न्यायालयात दाखल दाव्याबद्दल काहीही बोलणार नाहीत. आई मुलाशी फोन व व्हिडिओ कॉलवर बोलू शकते. भेटीचा कालावधी संपल्यावर मुलाचा ताबा पुन्हा आईकडे देण्यात यावा, अशा अटी न्यायालयाने घातल्या.

मुलाच्या मनात वडिलांविषयी दहशत

रेखा यांनी यास विरोध केला. ‘पतीला मद्याचे व्यसन आहे. त्यांनी मद्याच्या नशेत मला मुलासमोर मारहाण केली आहे. त्यामुळे मुलाच्या मनात वडिलांविषयी दहशत आहे. त्यांच्या घरी मुलाची काळजी घेणारे कोणीही नाहीत. मुलाची जबाबदारी मीच घेतली आहे. अचानक त्याचा ताबा नवऱ्याला देणे वेदनादायी आहे,’ असे त्यांचे म्हणणे होते.

वाद हे पती-पत्नीत असतात. त्याचा फटका मुलांना सहन करावा लागतो. अनेक प्रकरणांत असे घडले आहे. मुलांना आई आणि वडील या दोघांचेही प्रेम मिळणे आवश्यक असते. मुलांवर आई आणि वडील या दोघांचाही समान अधिकार असतो. तो अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, हेच न्यायालयाने या निकालातून दाखवून दिले आहे.

- ॲड. गायत्री कांबळे, अर्जदार पतीच्या वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT