je.jpg
je.jpg 
पुणे

आजींना कॅन्सर तर आजोबांना अर्धांगवायू तरीही दोघांनी हरविले कोरोनाला

संदीप जगदाळे

हडपसर : सातववाडी येथील शांताबाई कळसकर (वय ६८) व त्यांचे पती रजनीकांत कळसकर (वय ७२) या दांपत्याने कोरानावर मात केली व ते घरी परतले आहेत.

शांताबाई कळसकर गेली २ वर्षे कॅन्सर या जीवघेण्या दुर्धर आजाराशी लढत आहेत, तर पती रजनीकांत हे गेली ३५ वर्षे अर्धांगवायू पीडित आहेत. मात्र दोघांनीही कोरोनावर योग्य उपचार घेतल्याने आपण कोरोनाला हारवू शकतो हे सर्वांना दाखवून दिले. रुग्णालयातून घरी आल्यानंतर कळसकर दांम्पत्य आणि रोहित यांच्यावर नागरिकांनी फुलांचा वर्षाव व औक्षण करून स्वागत केले.

कोरोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह आल्यावर सुद्धा आजी डगमगल्या नाहीत. प्रचंड आत्मविश्वासाने त्या उपचारासाठी सज्ज झाल्या, पण त्यांना अनेक हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नव्हते. अखेर या भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुरसे यांनी लागलीच वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून बोपोडी येथील पुणे महानगर पालिकेच्या खेडेकर रुग्णालयात या दांपत्याला उपचारासाठी दाखल केले. पण प्रश्न होता अर्धांगवायुने आजारी असलेल्या आजोबांचा. त्यांच्यासाठी मदतनीस असणे गरजेचे आहे, असे रुग्णालय प्रशासनाने कळविले व पुन्हा एक अडचण आली. या अडचणीच्या वेळी त्यांचा कोरोनामुक्त झालेला नातू रोहित हा धावून आला. रोहित न घाबरता कोरोना वॉर्डमध्ये आजी-आजोबांची सेवा करण्यासाठी दाखल झाला आणि दोघांना रोज जेवण, नाष्टा औषधी काढा देऊन त्यांना बरे करूनच घरी घेऊन आला.

 शांताबाई म्हणाल्या, ''प्रशांत सुरसे व पल्लवी सुरसे आणि त्यांच्या सहका-यांनी माझे मनोबल वाढविले व योग्य वेळी आम्हाला सहकार्य व मार्गदर्शन केले. यामुळे आम्हाला पुढील उपचार मिळाले व आम्ही कोरोनामुक्त झालो. कोरोनाला घाबरू नका. स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या व सरकारी नियमांचे पालन केल्यास कोरोनावर मात करणे सहज शक्य आहे.'' 

सुरसे म्हणाले, ''या भागातील प्रत्येक परिवार हा माझा आहे आणि प्रत्येक व्यक्ती ही माझ्या कुटूंबाची सदस्य आहे. या निस्वार्थी भावनेने मी आणि माझे सर्व सहकारी या परिसरात कोरोना बाधितांसाठी काम करत आहे. त्यांच्या परिवाराला येणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत. आत्मविश्वास ढळू देऊ नका. स्वतःला सावरा. कोरोनाबधित रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करा, त्यांना वाळीत टाकू नका, वेळ सगळ्यांवर येणार आहे आणि जाणार ही आहे.''

रुग्णालयातून घरी आल्यानंतर कळसकर दांम्पत्य आणि रोहित यांच्यावर फुलांचा वर्षाव व औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी पल्लवी सुरसे, ओम झंवर, हरीश शेलार, उल्हास भोंगळे, सचिन नेमकर, विरनाथ सरडे, आप्पा बोटे, मनोज पोटे, सचिन हिंगणे, युवक प्रतिष्ठान,  स्वाभिमानी महिला संघटनेचे पदाधिकारी उपस्थिती होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT