पुणे

दुष्काळाची दाहकता... द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची जीवघेणी कसरत

CD

फोटोओळ : KEM26B00595
केम : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर छाटणीच्या प्रतीक्षेत असलेल्या द्राक्षबागा.

द्राक्षबागांच्या छाटणीचा शेतकऱ्यांसमोर पेच
पाण्याची टंचाई, वाढता खर्च; हंगाम पूर्ण होईल का याची चिंता
केम, ता. ४ : येथे सुमारे ४०० एकरांवर द्राक्षबागांची लागवड आहे. यंदा दुष्काळाची झळ आतापासूनच जाणवू लागली आहे. त्यामुळे द्राक्षबागांची छाटणी आता केली, तर हंगाम पूर्ण होईल का, असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आहे.
द्राक्षबागेच्या कामासाठी उपलब्ध मजूर, त्यांची मजुरी, रासायनिक खते आणि औषधांचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत मोठा खर्च करून उत्पन्न हातात येईल का, याची शाश्वती नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कसरत जीवघेणी ठरत आहे. दरवर्षी ऑक्टोबर छाटणीचा हंगाम सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होतो. मात्र, अद्याप शेतकऱ्यांनी द्राक्षबागांची छाटणी केलेली नाही. सध्या उन्हाळ्यासारखे ऊन पडत आहे. त्यामुळे द्राक्षबागा फुटणे आणि पुढील वातावरण कसे राहील, याचीही चिंता आहे.
आतापासूनच उपलब्ध जलस्रोत आटत चालले असून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. संभाव्य धोका लक्षात येत असतानाही छाटणी करायची का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. पीक हातात येऊन उत्पन्न मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. या परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : चाकणमध्ये भाईगिरीचा थरार! फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसची तोडफोड

60 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, लंडनमध्ये घर; तब्बल 'इतक्या' कोटींची आहे अजय देवगणची संपत्ती, आकडा ऐकून थक्क व्हाल

Honey Trap Case : पाकिस्तानी महिला हेराच्या जाळ्यात अडकला नौदलाचा जवान

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू; १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार नाही दर्शन! जाणून घ्या 'या' प्रथेमागील नेमकं कारण...

Latest Marathi News Live Update : कोकणातील लोककलांना राजाश्रय मिळायला हवा; अनिकेत तटकरे

SCROLL FOR NEXT