पुणे

द्राक्षांचे हिरेपण ... !

CD

ROP26B02577
मेंढापूर (ता. पंढरपूर) : येथील शेतकरी सध्या द्राक्षघडांना समान सूर्यप्रकाश मिळेल अशी व्यवस्था करत आहेत. त्याप्रसंगी शेतकरी कुसुम यादव व दत्तात्रय यादव.

पै कोलिताही कोपे ऐसे, द्राक्षांचे हिरवेपण असे
द्राक्षपट्ट्यात घडांना ऊन देण्याचे काम; शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा

सकाळ वृत्तसेवा
रोपळे बुद्रूक, ता. २० : ‘पै कोलिताही कोपे ऐसे । द्राक्षांचे हिरवेपण असे । ते परिपाकी कां जैसे । माधुर्य आते ॥’ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओवीतील आशयाचे दृश्य सध्या द्राक्षपट्यात दिसू लागले आहे. त्यांचा हा विचार आजच्या काळात अधिक अर्थपूर्ण ठरतो आहे.
सध्या द्राक्षबागांमध्ये द्राक्षे हिरवी आहेत. हिरव्या अवस्थेतील द्राक्षांचा आंबटपणा इतका तीव्र असतो की तो जिभेला जळत्या कोळशासारखा चटका देतो. पण हाच आंबटपणा नकारात्मक नसून तो नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे. वेळ, योग्य तापमान, सूर्यप्रकाश आणि आवश्यक ती काळजी घेतली की हीच द्राक्षे परिपक्व होतात आणि त्यातून मधुर रस तयार होतो. घडांना समान सूर्यप्रकाश मिळावा यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी सध्या कृषी उदाहरणातून जीवनाचा खोल संदेश दिला आहे. आजच्या सामाजिक, आर्थिक आणि कृषी परिस्थितीत अनेक गोष्टी हिरव्या अवस्थेत आहेत. शेतकऱ्यांचे प्रयत्न, पिकांवरील मेहनत, नवीन उपक्रम, बदलांची बीजे हे सर्व अजून परिपाकाला पोहोचायचे आहे. या टप्प्यावर अधीरपणा, नकारात्मक प्रतिक्रिया किंवा घाई केली तर अपेक्षित गोडवा मिळणार नाही. संयम, सातत्य आणि योग्य निर्णय घेतले तरच यशाचे मधुर फळ मिळते.
द्राक्षबागेत जसे वेळेआधी काढलेली फळे आंबट लागतात, तसेच जीवनातही वेळेआधी घेतलेले निर्णय कटू परिणाम देऊ शकतात. सध्याच्या अडचणी, ताणतणाव आणि अस्वस्थतेच्या काळात ही ओवी आशेचा आणि संयमाचा संदेश देते. शेतकरी हा संदेश तंतोतंत पाळत आले आहेत. सध्या द्राक्षे अपरिपक्व अवस्थेत आहेत. त्यामुळे सर्वांनाच आता बाजारात मधुर द्राक्षे कधी येतील याची आस लागली आहे.
- -
कोट :
- हिरवी द्राक्ष खरोखरच खूपच आंबट असतात. पण संयम ठेवला आणि इथून पुढे कीडरोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगले केले तर या परिपाकातूनच गोड द्राक्षे तयार होतात. खरे माधुर्य जन्माला येते.
- दत्तात्रय यादव, शेतकरी, रोपळे बुद्रूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Latest Marathi News Live Update : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

Mulank : 'या' 3 महिन्यात जन्मलेल्या लोकांचे 35 वयानंतर चमकते नशीब; असतात लक्ष्मी-कुबेरचे लाडके, पण त्याआधी करावा लागतो खूप संघर्ष

Investment Planning: गुंतवणुकीत एक्झिट स्ट्रॅटेजी नसलेल्या गुंतवणूकदारांवर का येते पश्चात्तापाची वेळ?

SCROLL FOR NEXT