amit thakre esakal
पुणे

संत मदर तेरेसा वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थांना मोठी मदत

मनसे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी केले कौतुक

सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : संत मदर तेरेसा वाचनालयाच्या माध्यमातून या परिसरातील विद्यार्थांना मोठी मदत होणार आहे. ठोस कामांबरोबरच लोकउपयोगी कामांना नगरसेवक साईनाथ बाबर प्राधान्य देत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे. असे मत मनसे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

कोंढवा खुर्द येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या प्रयत्नातून व महापालिकेच्या माध्यमातून शिवनेरीनगर येथे भारतरत्न संत मदर तेरेसा अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. त्याचे उदघाटन मनसे युवानेते अमित राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ठाकरे बोलत होते. या वाचनालयात जवळपास १२५ विद्यार्थ्यांचा आसन क्षमता आहे. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका आरती साईनाथ बाबर यांनी केले होते. अल्पशा आजाराने निधन पावलेले शशिकांत कुदळे यांच्या परिवाराचे सात्वन व विचारपूस अमित ठाकरे यांनी कुदळे त्यांच्या घरी जावून केली.

कार्यक्रमास मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे, बाबू वागस्कर, बिशप थाँमस डाबरे, बिशप नरेश अंबाला, बिशप पाँल डुपारे, पास्टर जोशूआ मोतीवाला, पास्टर नरेंद्र महाडकर, पास्टर भालचंद्र कांबळे, फादर डाँमनिक ॲडम्स, अमोल शिरस, सुप्रिया शिंदे, हुसेनभाई शेख, रोहन गायकवाड आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.मराठी महाराष्ट्रात राहाणार्या व्यक्तीला यायलाच हवी. या राज ठाकरे यांच्या विचारांना आमचा पाठींबाच राहिल. असे मत बिशेप थाँमस डाबरे यांनी व्यक्त केले. नागरिकांना दिलेला शब्द आम्ही पाळला असून, प्रत्येक काम दूरष्टीकोन ठेवूनच केली आहेत. असे यावेळी साईनाथ बाबर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia Share Crash: एनव्हीडियाचा शेअर कोसळल्याने १३ भारतीय म्युच्युअल फंड अडचणीत? तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

Latest Marathi News Live Update: देश-विदेशातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT