दुसऱ्याला मोठे करण्यातच खरे मोठेपण
बलिदान चौकातील जैन स्थानकात आयोजित अक्षय चातुर्मासात परमपूज्य अक्षयश्री महाराज बोलत होते. स्वतः किती मोठे झालो, यापेक्षा आपल्यासोबतच्या किती जणांना मोठे केले, हे महत्त्वाचे आहे. सोबतच्या व्यक्तीला सहकार्याचा हात देऊन तिलाही प्रगतीची संधी द्यावी, असे प्रतिपादन त्यांनी केले. चांगल्या कामाचे श्रेय स्वतः घेणे आणि विपरीत घडल्यास दोष दुसऱ्यावर ढकलणे टाळावे. ‘मी’पणाचे प्रदर्शन न करता उत्तम कर्म करावे. महापुरुषांच्या मार्गावर चालत ध्येय निश्चित केल्यास तो मार्ग दिशादर्शक ठरतो आणि आत्मानंदाची प्राप्ती होते, असेही त्यांनी सांगितले.
-----------------------------
व्रतपालनातून पापमुक्तीचा मार्ग
जोडभावी पेठेतील श्री आदिश्वर जैन श्वेतांबर मंदिरात आयोजित आत्मोद्धार व्रत उत्सवात मुनिश्री प्रशांतरत्न विजय बोलत होते. व्रतांचे पालन केल्याने पापकर्मांना मर्यादा येते आणि पापमुक्तीच्या दिशेने वाटचाल करता येते. व्रत स्वीकारणे हा बंधनाचा नव्हे, तर आनंदाचा उत्सव आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. भगवान महावीरांचे महाश्रावक आनंद यांनी बारा व्रते स्वीकारून पापांचा त्याग केला. त्यांचा आदर्श ठेवून स्वतःतील पापकर्म ओळखून त्यापासून दूर राहावे. व्रतांमुळे जीवन संयमित होते. ‘प्राण जाए पर वचन न जाए’ या नीतीनुसार स्वीकारलेल्या प्रतिज्ञेचे अखंड आणि योग्य पालन करावे, असे आवाहन मुनिश्रींनी व्रतधारींना केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.