पुणे

पुण्यातील पेठांमधील हरित क्षेत्र एक टक्केपेक्षा कमी

पुण्यात वृक्षांची संख्या मोठी असल्याने शहराला हिरवी चादर पांघरल्यासारखे वाटेत, रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांमुळे शहराचे सौंदर्य देखील खुलते.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - पुण्यात (Pune) वृक्षांची (Tree) संख्या मोठी असल्याने शहराला हिरवी चादर पांघरल्यासारखे वाटेत, रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांमुळे शहराचे सौंदर्य (Beauty) देखील खुलते. मात्र, शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील वृक्ष संख्या शहराच्या एकूण झाडांच्या संख्येच्या एक टक्का देखील झाडे नसल्याचे धक्कादायक वास्तव महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून (Municipal Environment Report) समोर आले आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय व कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अवघे ४६ हजार ६७९ झाडांची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक ११ लाख १३ हजार ५१२ झाडे धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत आहेत. (Green Area in the Pune City is Less than One Percent)

पुण्यामध्ये असलेल्या पेठांमध्ये दाट लोकवस्ती आहे. पूर्वी वाड्यांची संख्या मोठी होती, पण काळाच्या ओघात वाड्यांची जागा आता अपार्टमेंट, सोसायट्यांनी घेतली आहे. या भागात नव्याने बांधकाम होत असले तरी झाडांची संख्या कमी होत आहे. अनेकदा जुनी झालेली झाडे उन्मळून पडतात, तर कधी बांधकामासाठी आड येणारी झाडे रीतसर परवानगी घेऊन हटविली जातात. पण त्यानंतर त्यांचे पुनर्रोपण केले जातेच असे नाही.त्याचा फटका आहे, मध्यवर्ती पेठांना बसत आहे. महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १२ हजार ४७४ तर कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ३४ हजार २०५ झाडांची नोंद झाली आहे.

पर्यावरण अहवालात शहराची लोकसंख्या ३४ लाख इतकी असल्याचे सांगितले जात असले तरी लोकसंख्येच्या तुलनेत झाडांची संख्या जास्त आहे.

१५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकूण ४७ लाख १३ हजार ७९१ झाडांची नोंद झाली असून, लोकसंख्येच्या तुलनेत १३ लाखापेक्षा जास्त असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. पण दाट लोकवस्ती व जुन्या पुण्याच्या पाऊलखुणा असलेल्या पेठांमध्ये झाडांची संख्‍या कमी झाली आहे.

शहरात सर्वाधिक हरीतक्षेत्र धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत आहे, तेथे ११ लाख १३ हजार इतकी झाडे आहेत. त्याखालोखाल हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ४लाख ८७ हजार, नगर रस्ता-वडगावशेरी ४लाख ७० हजार, शिवाजीनगर-घोले रस्ता लाख ४३ हजार, कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ४ लाख २९ हजार झाडांची नोंद झाली आहे. ही पाच क्षेत्रीय कार्यालये सोडत उर्वरित १० क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील झाडांची संख्या ४ लाखापेक्षा कमी आहे.

क्षेत्रीय कार्यालय निहाय झाडांची संख्या

येरवडा-धानोरी - २४१२४५

कोंढवा-येवलेवाडी - २०६३०१

बिबवेवाडी - ११७७३४

ढोले पाटील - २८४१५२

धनकवडी-सहकारनगर - १११३५१२

वारजे-कर्वेनगर - १५९५८७

कसबा-विश्रामबागवाडा - ३४२०५

वानवडी-रामटेकडी - १७५,४४२

औंध-बाणेर - ३९८९४१

कोथरूड-बावधन - ४२९८५६

शिवाजीनगर- घोले रस्ता - ४४३०४२

भवानी पेठ - १२,४७४

नगर रस्ता -वडगावशेरी - ४७०८३७

हडपसर-मुंढवा - ४८७७५७

सिंहगड रस्ता - १३८७०६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

SCROLL FOR NEXT