पुणे

नीरा नरसिंहपूर परिसरात चारा साठवणुकीची लगबग

CD

नीरा नरसिंहपूर, ता. १९ : पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी नीरा नरसिंहपूर परिसरातील शेतकऱ्यांनी आतापासूनच मकवान व कडवळ या हिरव्या चाऱ्याची कुट्टी करून ती साठवण्याची लगबग सुरू केली आहे.
पावसाअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. उपलब्ध चारा पिकांपासून जास्तीत जास्त चारा मिळवून तो पुढील काळासाठी साठवण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मकवान व कडवळाची कापणी करून यंत्राद्वारे कुट्टी केली जात आहे. ही कुट्टी वाळवून सुरक्षित साठवून ठेवल्याने दुष्काळात जनावरांना चारा उपलब्ध होईल, असे सचिन माने, केशव बोडके, अशोक बोडके यांनी सांगितले. चारा टंचाईमुळे बाहेरून महागडा चारा खरेदी करावा लागू नये, यासाठी राहुल बागल, नंदकुमार शिंदे, नवनाथ वाळेकर, संतोष सूतार, फणिंद्र कांबळे हे शेतकरी नियोजन करत आहेत.
चाऱ्याच्या साठवणुकीसाठी लागणाऱ्या एक टनाच्या बॅगेची किंमत ४५० रुपये, तीन टनाची ११०० रुपये, तर पाच टनाची बॅग १४०० रुपयांना मिळत असल्याचे दुकानदार निलेश ताटे (टेंभुर्णी) व आकाश मोहिते (पिंपरी बुद्रुक) यांनी सांगितले. एक टन चाऱ्याची कटाई, कुट्टी आणि साठवणुकीची मजुरी साडेतीन हजार रुपये असून, मजुरांना टनाला एक हजार रुपये मजुरी दिली जात असल्याची माहिती आप्पा निंबाळकर (आलेगाव) यांनी दिली. या कामातून मजुरांना दुष्काळात रोजगाराचा मोठा आधार मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Rain Update : दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा हाय अलर्ट! तर महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी!

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Latest Marathi News Live Update : महायुतीला धक्का! फेरमतमोजणीची मागणी फेटाळली, सतेज पाटलांच्या समविचारी १३ तर महायुतीला १२ जागा

SCROLL FOR NEXT