फोटोओळ : VLS26B02026
कडबनवाडी : येथील हरित सहलीत सहभागी झालेले सोलापूरमधील पर्यावरणप्रेमी.
निसर्गाच्या सान्निध्यात पर्यावरणप्रेमींची हरित सहल
कडबनवाडीत १,७०० एकरांच्या गवताळ प्रदेशाची सफर; पक्षी, वन्यप्राण्यांचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २६ : निसर्गाशी सुसंवाद साधत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पर्यावरण संरक्षण गतिविधीच्या वतीने आयोजित हरित सहल नुकतीच कडबनवाडी येथे झाली. पर्यावरण संरक्षण गतिविधी, पुणे प्रांत आणि कडबनवाडी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमात सोलापूरसह पुणे, पिंपरी-चिंचवड आणि अन्य जिल्ह्यांतील पर्यावरणप्रेमी, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले. १२ वर्षांच्या मुलांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांनी सहलीचा आनंद घेतला.
कडबनवाडीतील ज्येष्ठ नागरिक व पर्यावरणप्रेमी भजनदास पवार यांच्या प्रयत्नांतून विकसित झालेली वनजमीन व ऑक्सिजन पार्कमधील गवताळ प्रदेश सहलीचे प्रमुख आकर्षण ठरले. येथे कोतवाल, वेडा राघू, पांढऱ्या पायाची टीटवी (धावीक), ग्रे पिजन, मुनिया, धोबी, सातभाई, कॉलर पिजन, शिर्के (श्राइक), गरुड यांसारखे पक्षी, तसेच चिंकारा, तरस आणि घोरपड या वन्यजीवांचे दर्शन घडले.
वनविभागाच्या वनरक्षक व वनमार्गदर्शकांनी १,७०० एकरांच्या गवताळ प्रदेशाची आणि तेथील पक्षी-प्राण्यांची माहिती सहभागी नागरिकांना दिली. सहलीचे नियोजन प्रांत कार्यवाह रमेश करपे आणि प्रवीण तळे यांनी केले. निवासी सहल यशस्वी करण्यासाठी रमेश करपे, प्रवीण तळे, भजनदास पवार, सरपंच दादा गावडे, ग्रामविकास अधिकारी दादा जाधव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जाधव आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.