पुणे

कोरोनामुळे तुळापूरात छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी प्रातिनिधिक स्वरूपात

सकाळवृत्तसेवा

केसनंद : श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३२ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम कोरोनाच्या सावटामुळे प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय सलामी देवून करण्यात आला. तर बलिदान मासानिमित्त अनेक शंभूभक्तांनी रक्तदानही केले. 

या वर्षीही कोरोनाच्या वाढत्या सावटामुळे तुळापूर येथील पुण्यतिथीचे दरवर्षीचे कार्यक्रम प्रशासनाच्या सूचनेनुसार ग्रामपचांयतीने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे कोविडचे नियम पाळून केवळ प्रातिनिधीक कार्यक्रम म्हणून आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते शंभुराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व येरवडा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव यांच्या हस्ते समाधिस्थळी शासकीय पुजा करण्यात आली. यावेळी पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने मानवंदनाही देण्यात आली. पुण्यतिथीनिमित्त समाधि स्थळी फुलांची सजावट करण्यात आली होती.

या प्रसंगी उपस्थित मान्यवर तहसिलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर आदींचे सरपंच ॲड. गुंफा ज्ञानेश्वर इंगळे, उपसरपंच पवन खैरे व ग्रामविकास अधिकारी रतन दवणे यांनी स्वागत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. शंभुभक्त व ग्रामस्थांनी घरुनच अभिवादन केले. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'मी महादेवाचा अवतार, तुला चांगलं करिअर घडवायचं असेल तर..'; वासनांध खरातचा शिक्षण घेणाऱ्या युवतीवर अत्याचार, कॅप्टनविरोधात सातवा गुन्हा

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सचं चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज... ऋतुराजने सांगितली ओपनिंग जोडी, आता धमाल येणार

Akkalkot News: तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्री बंद; नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टींचा घोषणा; आजपासून अंमलबजावणी!

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT