पुणे

दौंड येथे हुतात्मा पोलिसांना अभिवादन 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या देशातील पोलिस अधिकारी व जवानांना दौंड शहरात पोलिसांच्या वतीने मानवंदना देत अभिवादन करण्यात आले.

दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) मैदानावर आज (ता. २१) हुतात्मा पोलिसांना अभिवादन करण्यात आले.

देशभरात १ सप्टेंबर २०१९ ते ३१ ऑगस्ट  २०२० या कालावधीत कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना अभिवादन करण्यात आले. धीरगंभीर वातावरणात राज्य राखीव पोलिस दलाच्या बॅण्‍ड पथकाने शोक धून वाजविली.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

एसआरपीएफ गट क्रमांक सातचे समादेशक श्रीकांत पाठक, गट पाचचे समादेशक तानाजी चिखले, नानवीज (ता. दौंड) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य संदीप आटोळे, राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रोहिदास पवार यांच्यासह सहायक समादेशक सुभाष धुमाळ, चंद्रकांत शारबिद्रे, उप प्राचार्य कैलास न्यायनीत यांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. एसआरपीएफ, नानवीज (ता. दौंड) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र आणि राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रातील एकूण ३१ अधिकारी व २३३ पोलिस कर्मचारी यांच्यासह हुतात्मा पोलिसांचे कुटुंबीयांनी या वेळी अभिवादन केले.

दौंड पोलिस ठाण्यात हुतात्मा पोलिसांच्या नामावलीचे वाचन करून पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्यासह अधिकारी व पोलिस कर्मचार्यांनी श्रध्दांजली वाहिली. 

पोलिस हुतात्मा दिन- २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखच्या पूर्वोत्तर भागातील हॉटस्प्रिंग येथे केंद्रीय राखीव पोलिस सुरक्षा दलाच्या तुकडीवर चिनी लष्कराच्या बटालियनने केलेल्या हल्ल्यात भारताचे दहा जवान हुतात्मा झाले होते. सर्वोच्च बलिदान देणार्या या पोलिसांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण आणि या हुतात्मा झालेल्या पोलिसांमाणे राष्ट्रनिष्ठेची ज्योत पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तेवत राहावी, याकरिता जानेवारी १९६० मध्ये झालेल्या देशाच्या सर्व पोलिस महानिरीक्षकांच्या परिषदेत दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Compensation Rule: महाराष्ट्रात अतिवृष्टी मदतीत मोठा बदल! सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार; ‘मर्यादा’ पूर्णपणे रद्द

"न रडता तिने स्वतःसाठी नवा मार्ग शोधला" सिद्धार्थने केलं बायकोचं कौतुक; बायकोच्या नव्या करिअरविषयी म्हणाला..

Pimpri News: पाणीगळतीने ‘ग्रेडसेपरेटर’ धोकादायक; सात वर्षांपासून कारण सापडेना; तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा महापालिकेवर आरोप

Latest Marathi News Live Update : खरातशी निकट संबंध असलेल्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी – अनिल देशमुख

Pune News: पिंपळवंडीत अघोरी पूजेचा प्रकार?; स्मशानभूमीत जळत्या चितेवर टाकले मृत कोंबडे, जुन्नर तालुक्यातील धक्कादायक प्रकार!

SCROLL FOR NEXT