Worker 
पुणे

Coronavirus : किराणा मालाच्या भावात दहा टक्‍क्‍यांनी वाढ

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड - कोरोनाच्या धास्तीने माल वाहतुकीसाठी ड्रायव्हर व अन्य कर्मचारी मिळत नाहीत. वाहतुकदारांकडून माल वाहतुकीस टाळाटाळ केली जात आहे. परतीचे भाडेदेखील द्यावे लागत असल्याने वाहतूक खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. यामुळे सध्या सर्वच किराणा मालाच्या भावामध्ये साधारणतः १० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली आहे.

गुलडेकडी येथील मार्केट यार्डातील भुसार विभागात महाराष्ट्रासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात किराणा मालाची आवक होत असते. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल, चहाच्या टपऱ्या बंद आहेत. यामुळे परराज्य व राज्यातील विविध भागातून माल घेऊन येणाऱ्या ड्रायव्हर, क्‍लिनर लोकांचे प्रवासा दरम्यान खाण्या-पिण्याचे प्रचंड हाल होत आहेत.

यामुळे माल वाहतुकीस ड्रायव्हर मिळत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच मार्केट यार्डात माल घेऊन आल्यानंतर परत जाताना काहीच भाडे मिळत नाही. यामुळे सध्या माल वाहतुकदारांकडून दुप्पट भाडे आकारले जात असल्याचे ओस्तवाल यांनी सांगितले. 
या कारणांमुळे किराणा मालाच्या भावामध्ये साधारणतः १० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

दरम्यान मार्केट यार्डात सर्व प्रकारचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. गुळ भुसार विभाग साप्ताहिक सुट्टी सोडून सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत चालू राहणार असल्याची माहिती ओस्तवाल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांच्या हाती मोठी ताकद! आता कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलता येणार, फडणवीसांना नवे अधिकार

समर देणार स्पेशल Surprise, 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतील स्वानंदीचा मॉडर्न लूक पाहून चाहते म्हणाले, 'ही तर...'

E10 Fuel: E10 पर्याय पुन्हा आणावा, जुन्या वाहनांसाठी उपयुक्त; मुख्य आर्थिक सल्लागारांची केंद्र सरकारला सूचना

Marathi News Updates : सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाची होणार फैसला? धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना मिळणार?

Madhya Pradesh Road Accident : गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात पिकअप-डंपरची धडक, ८ मजुरांचा जागीच मृत्यू, ३२ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT