undjpg1 
पुणे

सजवलेल्या बैलगाडीतून नवरदेव लग्नमंडपात!

विजय मोरे ः सकाळ वृत्तसेवा

जराडवाडीत जुन्या परंपरेला

उजाळा देत लग्न सोहळा थाटात

उंडवडी : सध्या लग्नसमारंभारात चारचाकी आलिशान गाड्यांची क्रेझ वाढत असताना जराडवाडी (ता. बारामती) येथील नवरा मुलगा मात्र चक्क सजवलेल्या बैलगाडीतून करवल्यांसह लग्नमंडपात दाखल झाला. जुन्या रूढी-परंपरेला उजाळा देत हा लग्न सोहळा नुकताच थाटात पार पडला.

जराडवाडी येथील शेतकरी कल्याण भगवान साळुंके यांचे चिरंजीव अमोल व कडेठाण (ता. दौंड) येथील शेतकरी सुनील भगवान यादव यांची ज्येष्ठ कन्या प्राजक्ता यांचा लग्नसोहळा सोनवडी सुपे (ता. बारामती) येथे पार पडला. नवरी मुलगी आपल्या मामाच्या घरी म्हणजे उंडवडी कडेपठार येथे दादा जराड यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होती. शिक्षणाबरोबरच तिच्या लग्नाचीही जबाबदारी मामाने घेतली होती.

नवरदेवाला लग्न सोहळ्यासाठी सजविलेल्या बैलगाडीतून वाजत-गाजत नेण्याचा विचार मांडण्यात आला. साळुंके कुटुंबातील नवरदेवाचे चुलते मिलन साळुंके आणि करवले सचिन, मयूर, समीर, सौरभ, सारंग व इतर बंधूंनी नवरदेवाला बैलगाडीतून मंडपात नेण्याची संकल्पना मांडली. त्याबाबत बैलगाडीची व्यवस्थाही केली. बाळासाहेब साळुंके यांनी लगेच आपली बैलगाडी उपलब्ध करून दिली. पांढरीशुभ्र बैलजोडीची बैलगाडी नवरदेवासाठी सजली आणि पारंपरिक पद्धतीने सुशिक्षित नवरदेव व नटलेल्या करवल्या आदींसह नवरदेव लग्नमंडपाकडे निघाले. या वेळी वरबाप कल्याण साळुंके आणि वरमाई दीपाली साळुंके यांनासुद्धा बैलगाडीत बसण्याचा मोह आवरला नाही.

या घटनेमुळे पारंपरिक पद्धतीला उजाळा मिळाला. त्यानंतर सर्व बुजुर्ग वऱ्हाडी मंडळींमध्ये स्वतःच्या लग्नाला किती बैलगाड्या होत्या. पारंपरिक पद्धतीने कशी पाच दिवस लग्न लागत. माणसाकडे पैसा कमी होता, पण समाधान होते, याची चर्चा लग्नमंडपात रंगली होती.
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT