पुणे

शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश

CD

उपसा सिंचन बंदी २६ जूनपर्यंत शिथिल

शेतकऱ्यांना दिलासा; महावितरणला वीज कनेक्शन तत्काळ चालू करण्याचे निर्देश

काशीळ, ता. २२ : जिल्ह्यातील कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांवर लागू करण्यात आलेली उपसा सिंचन बंदी अखेर २६ जूनपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून पिकांच्या पाण्यासाठी चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून, शेती पिकांचे होणारे नुकसान आता टळणार आहे. या बंदी उठवण्यावरून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटना या दोन्ही बाजूंनी आपापल्या प्रयत्नांना यश आल्याचा दावा केला आहे.

‘एल निनो’चा प्रभाव, मॉन्सूनची संथ गती आणि हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन जिल्ह्यातील धरणे, नद्या आणि तलावांमधील सिंचनासाठीच्या मोटारींची वीज कनेक्शन्स खंडित करण्याचे आदेश देण्यात आले होते. केवळ पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे कनेक्शन चालू ठेवण्यात आले होते; परंतु पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांमुळे वरिष्ठस्तरावरून अखेर सकारात्मक निर्देश प्राप्त झाले. त्यानुसार सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता ज. स. शिंदे यांनी कृष्णा नदी व तिच्या उपनद्या (कुडाळी, वेण्णा, उरमोडी, तारळी, वांग, उत्तरमांड, कोयना) वरील उपसा बंदी २६ जून २०२६ पर्यंत शिथिल करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाने महावितरणला अधिकृत पत्र पाठवून नदीवरील सिंचनासाठीचे उपसा वीज कनेक्शन तत्काळ चालू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महावितरणने आपल्या अंतर्गत येणाऱ्या विभागीय तसेच उपविभागीय कार्यालयांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. लोकप्रतिनिधींनी तत्काळ दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल एकीकडे समाधान व्यक्त होत आहे.

दुसरीकडे, हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि शेतकरी संघटनांच्या तीव्र आंदोलनाचा विजय असल्याचे ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने म्हटले आहे. शेतीसाठी केलेली पाणी उपसाबंदी शिथिल व्हावी, यासाठी विविध संघटनांनी आणि शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर मोठा उठाव केला होता. या प्रशासकीय आदेशानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (ता. २३) नागठाणे येथे या आदेशाची प्रत्यक्ष प्रत स्वीकारून हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले जाईल. मात्र, ही शिथिलता केवळ चार दिवसांची (२६ जूनपर्यंत) असल्याने २६ तारखेनंतर काय करायचे व पुढील आंदोलनाची दिशा काय असावी? याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उद्या सकाळी १० वाजता चौंडेश्वरी मंदिर, नागठाणे येथे उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे. काही लोक हा उपसाबंदी आदेश आमच्यामुळेच शिथिल झाला म्हणून उर बडवून घेत आहेत. त्यांना आमचा एकच प्रश्न आहे, की जर तुम्हाला एवढीच शेतकऱ्यांची काळजी होती, तर शेजारच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उपसाबंदी केव्हाच शिथिल झाली होती, मग तुम्ही त्याच वेळी सातारा जिल्ह्यातील उपसा बंदी का शिथिल केली नाही? अशा तिखट शब्दात जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांनी निशाणा साधला आहे. एकंदरीत, प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय श्रेयवाद सुरू झाला असला, तरी ऐन उन्हातान्हात सुकणाऱ्या पिकांना पाणी मिळणार असल्याने जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये मात्र सध्यातरी आनंदाचे वातावरण आहे.
------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Qatar LNG Plant Explosion : कतारच्या एलएनजी प्लँटमध्ये भीषण स्फोट; १२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, भारतीय दुतावासाकडून चिंता व्यक्त

Pakistan Water Shortage: पाकच्या हैदराबादमध्ये भीषण पाणीटंचाई; उद्योग क्षेत्र संकटात, उत्पादनावर परिणाम; जनजीवन विस्कळित

पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात लागताच फोन, ओमराजेंना काय सांगितलं? एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

Nagpur: ४२ वर्षीय डॉक्टरनं भुलीचं इंजेक्शन टोचून घेत आयुष्य संपवलं, ५ दिवसांपासून गेले नव्हते घरी

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जूनपर्यंत येलो अलर्ट; ३० जूनपर्यंत पडणार दमदार पाऊस

SCROLL FOR NEXT