Pre-Wedding
Pre-Wedding 
पुणे

‘प्री-वेडिंग शूट’ची वाढती क्रेझ

मंगेश पांडे

पिंपरी - लग्नसोहळ्यातील गोड आठवणी जपण्यासाठी आपण प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करतोच. मात्र, सध्याच्या जमान्यात लग्नापूर्वीच्या आठवणी कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी ‘प्री-वेडिंग शूट’ करण्याची क्रेझ वाढत आहे. 

सध्या अनेक लग्नसोहळे भव्यदिव्य स्वरूपात साजरे होताना दिसतात. साखरपुडा, हळद व लग्नसमारंभातील फोटो व व्हिडिओ शूटिंग करण्यासह लग्नाच्या आधीच्या क्षणांचा आनंद साठवून ठेवण्याकडेही तरुणाईचा कल वाढत आहे. यासाठी प्री-वेडिंग शूट करण्यावर भर दिला जात आहे. पूर्वी लग्न होईपर्यंत नववधू-वरांचे भेटणे तर दूरच, बोलणेही होत नसायचे. मात्र, सध्याची तरुणाई आयुष्यातील महत्त्वाच्या सोहळ्याला कॅमेऱ्यात बंदिस्त करताना दिसत आहे. यामुळे मागील काही वर्षांत प्री-वेडिंग शूटिंगचे प्रमाण वाढले असून, फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांनाही मागणी वाढली असल्याचे दिसून येते.

प्री-वेडिंग शूटच्या वेळी वेगवेगळ्या फोटो फ्रेम्स, टोपी, छत्री, बाइक, सायकल, गिटार यांसह विविध प्रकारची शायरी तसेच लग्नाची तारीख लिहिलेल्या पाट्या, असे प्रॉप्स वापरले जातात. फोटो काढताना त्याचे चित्रीकरणही केले जात असते. बजेटनुसार जोडप्यांना लोकेशनची निवड करून दिली जाते. नेमके कोणत्या गाण्यावर चित्रीकरण करायचे, त्यासाठी आवश्‍यक लोकेशन कोणते, ड्रेपरी कोणत्या पद्धतीची लागेल, याबाबत जोडप्यांना माहिती दिली जाते.

लग्नाआधीची भेट ही नव वधू-वरांसाठी अनोखे गिफ्ट असते. ही भेट कायम स्मरणात राहावी, यासाठी अनेकजण ‘प्री-वेडिंग शूट’ करण्यास प्राधान्य देतात. दूर अंतरावरचे लोकेशन असल्यास शूटसाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागतो. समुद्रकिनारी अथवा ग्रामीण भागातील शेतात शूट करण्यास अधिक पसंती दिली जात आहे.  
- गोपाल निकुंभ, छायाचित्रकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT