GST 
पुणे

शहरातील १२० करबुडवे गायब

सुधीर साबळे

पिंपरी - केंद्र सरकारने वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कायदा लागू केला असला, तरी त्याआधी अस्तित्वात असणाऱ्या सेवाकर बुडवणारे शहरातील सुमारे १२० जण गायब झाले आहेत. त्यांनी सुमारे ४१ कोटी रुपयांचा कर बुडविला असला, तरी येत्या काही दिवसांत ही रक्‍कम दंडासहित वसूल करण्यात येणार असल्याचे केंद्रीय वस्तू आणि सेवाकर विभागातील सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

सेवाकराची रक्‍कम बुडवणाऱ्यांमध्ये तळेगाव, पिंपरी, भोसरी आणि चाकण पट्ट्यातील व्यावसायिक आणि लघुउद्योगांचा समावेश आहे. करचुकवेगिरी करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवाकर विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. 

केंद्रीय वस्तू आणि सेवाकर विभागाकडे नोंदणी करताना दिलेल्या पॅनच्या आधारे कर न भरणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. शहराव्यतिरिक्‍त देशात अन्य कोणत्या भागांत यांनी व्यवसाय सुरू केला आहे का, याची माहिती जमा करण्यात येत आहे. ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातूनही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
- अमित नायक, सहायक आयुक्‍त आणि नोडल ऑफिसर, केंद्रीय वस्तू आणि सेवाकर विभाग

वस्तुस्थिती काय? 
केंद्र सरकारने वस्तू आणि सेवाकर कायदा लागू केला. त्यानंतर जुना सेवाकर भरण्यासाठी व्यावसायिकांना मुदत दिली होती. काहींनी ती रक्‍कम थकीत ठेवली. त्यांची माहिती घेऊन यादी तयार केली. त्यात काहींनी युनिट बंद केल्याचे तर काही जण नोंदणीकृत पत्त्यावर सापडत नसल्याचे समोर आले. 

१९ कोटींची वसुली
शहरातील पिंपरी, चाकण, तळेगाव, भोसरी पट्ट्यात सुरू असणारे काही उद्योग, व्यावसायिकांकडून जुन्या सेवाकराच्या रकमेपोटी १९ कोटी रुपयांची रक्‍कम येणे बाकी आहे. संबंधितांना नोटिसा बजावल्या असून, वसुलीचे काम वेगात सुरू आहे. 

खाती बंदची प्रक्रिया
जुन्या सेवाकराची सुमारे ३३ कोटी रुपयांची थकीत रक्‍कम न भरणाऱ्यांचे बॅंक खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आगामी काळात याचा वेग वाढविणार आहे. 

प्राप्तिकर खात्याला पत्र
जुन्या सेवाकराची रक्‍कम न भरता गायब झालेल्यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवाकर विभागाने प्राप्तिकर विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडून माहिती मागविली असून, त्याआधारे तपास करण्यात येणार आहे. शोधासाठी फेसबुक, व्हॉट्‌सॲपचाही उपयोग करण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT