पुणे

देलवडीत २० गुंठ्यांत फुलविली लुसलुशीत गवार

CD

खुटबाव, ता. २९ : देलवडी (ता. दौंड) येथील अवघी एक एकर शेती असणाऱ्या अल्पभूधारक सय्यद परिवाराने २० गुंठे क्षेत्रात गावरान लुसलुशीत गवारीचे उत्पादन घेतले. तिला उच्चांकी प्रतिकिलो ८० ते ९० रुपये बाजारभाव मिळाला आहे. त्यामुळे राजूभाई सय्यद व असिफ सय्यद या पितापुत्रांना महिनाभरात एक लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.
सय्यद यांनी जून महिन्यामध्ये गवार लागवडीसाठी सर्वप्रथम शेतामध्ये शेणखत टाकले. त्यानंतर शेताची नांगरट केली. प्रत्येकी दोन फूट अंतरावर समांतर सरी तयार केल्या. गवारीसाठी आवश्यक खते वापरली. औषधांची फवारणी केली. ७० दिवसांनी गवारीचा पहिला तोडा सुरू झाला. पहिल्याच तोड्यामध्ये १० किलो गवार निघाली. सध्या आठवड्यातून दोन वेळा गवार तोडणी होत असून प्रत्येक तोड्याला ९० ते १०० किलो माल निघत आहे.

सय्यद परिवारातील पिता-पुत्र व महिला घरच्या घरी गवारीची तोडणी करत आहेत. त्यामुळे मजुरी खर्च वाचत आहे. शेतातून निघालेली ताजी हिरवी लुसलुशीत गवार क्रेटमध्ये भरली जाते. चंदननगर (पुणे) येथील बाजारपेठेत विकली जात आहे.


प्रत्येक तोड्याला नऊ हजार रुपयांची पट्टी
प्रत्येक वेळी गवार टेम्पोमधून बाजारामध्ये विकण्यासाठी येताच खासगी व्यापारी घाऊक प्रतिकिलो ८० ते ९० रुपये भावाने मालाची खरेदी करत आहेत. त्यामुळे प्रत्येक तोड्याला आठ ते नऊ हजार रुपये पट्टी येत आहे. आजतागायत १५ तोडे झाले असून अजून महिनाभर पीक चालेल असा अंदाज सय्यद यांनी व्यक्त केला आहे.

आचारी काम करतो. अल्पभूधारक शेतकरी असल्याने चांगले उत्पन्न मिळावे म्हणून गवार शेती करण्याचा निर्णय घेतला. पत्नी व मुलगा पूर्णवेळ काम करतात. भविष्यामध्ये अधिकाधिक भाजीपाला उत्पादन घेणार आहे.
- राजुभाई सय्यद, गवार उत्पादक

03832

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: विमानतळाचा कर्मचाऱ्याकडूनच सोन्याची तस्करी; DRIच्या धडक कारवाईत १० कोटींचे सोने जप्त, ६ जणांना अटक

Nepal Flood: 'तो' आयुष्यातील शेवटचा धावण्याचा क्षण..., नेपाळच्या महापुरातून वाचलेल्यांची अंगावर काटा आणणारी कहाणी

Solapur Heritage: चुना-मातीविना उभारलेले मंदिर! मोहोळजवळील नीलकंठेश्वराचा प्राचीन इतिहास थक्क करणारा

Shravan Month Memories : श्रावण आला की जाग्या होतात बालपणीच्या आठवणी; केळीच्या पानावरील जेवणाची खास गोष्ट

Marathi News Live Updates : समृद्धी महामार्गावर उद्यापासून ७ सप्टेंबरपर्यंत वाहतूक ब्लॉक

SCROLL FOR NEXT