पुणे

ममदापूर येथे दीड एकर पेरू बागेतून राजाभाऊ गोरे यांचे 20 लाखांचे उत्पन्न

CD

PGR26B03761
ममदापूर (ता. बार्शी) ः येथील शेतकरी राजाभाऊ गोरे याची पेरू बाग व फळ.

दीड एकर, १६०० झाडे अन् २० लाखांचे उत्पन्न!
पेरू लागवडीतून ममदापूरच्या राजाभाऊ गोरे यांचा यशस्वी प्रयोग; दोन बहरांत उत्पादन, ७७ रुपये किलो दराने विक्री

बाबासाहेब शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
पांगरी, ता. ३ ः ममदापूर (ता. बार्शी) येथील शेतकरी राजाभाऊ गोरे यांनी पारंपरिक पिकांसोबत फळबागेचा पर्याय स्वीकारत नवी दिशा दिली आहे. अवघ्या दीड एकर क्षेत्रात पेरूची बाग उभी करून त्यांनी तब्बल २० लाखांचे उत्पादन घेतले आहे.

गोरे यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये आंध्र प्रदेशातून ‘पिंक तैवान’ या पेरू वाणाची रोपे आणून दीड एकर क्षेत्रात लागवड केली. आठ बाय पाच फूट अंतरावर भोंद तयार करून सुमारे १६०० रोपांची लागवड करण्यात आली.

आठ महिन्यांत पहिला बहर
आठ महिन्यांत बागेत पहिला बहर घेण्यात आला. त्यातून सहा लाख रुपयांचे उत्पादन मिळाले. मार्च महिन्यात बागेची छाटणी केली. छाटणीनंतर सहा महिन्यांत दुसरा बहर घेण्यात आला. या बहरातील पेरूचा दर्जा चांगला असल्याने जागेवरच ७७ रुपये किलो दराने मालाची विक्री झाली. एका झाडाला सरासरी २०० फळे लागल्याचे दिसून आले. त्यातील अनेक फळांचे वजन सुमारे ३५० ग्रॅमपर्यंत झाले.

सेंद्रिय खतांवर भर
पेरू बागेच्या व्यवस्थापनात रासायनिक खतांचा कमीतकमी वापर करत गोरे यांनी सेंद्रिय खतांवर विशेष भर दिला. कोंबडी खत, शेणखत अन् गोमूत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.
चार तास ठिबक सिंचन
बागेला दररोज सुमारे चार तास ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यात येत होते. त्यासोबत आठवड्यातून एकदा पाटाने पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. बागेस संगमनेरचे अभिजित जोंधळे यांचे मार्गदर्शन लाभले.
--
राजाभाऊ गोरे यांचा पेरू प्रयोग
क्षेत्र : दीड एकर, वाण : पिंक तैवान, लागवड : ऑक्टोबर २०२५, रोपे : सुमारे १६००, लागवड अंतर : ८ बाय ५ फूट, पहिला बहर : आठ महिन्यांत
पहिल्या बहरातील उत्पादन : ६ लाख रुपये, दुसरा बहर : छाटणीनंतर सहा महिन्यांत, विक्री दर : ७७ रुपये किलो, एका झाडाला : सरासरी २०० फळे,
फळांचे वजन : सुमारे ३५० ग्रॅमपर्यंत, एकूण उत्पादन : २० लाख रुपये

कोट
- पारंपरिक शेतीत हवामानातील बदल,पावसाचे अनिश्चित प्रमाण आणि उत्पादन खर्चाची वाढ यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत कमी क्षेत्रात योग्य नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर आणि बाजारपेठेचा विचार करून फळबाग उभी केली आणि चांगले उत्पन्न मिळू शकले.
- राजाभाऊ गोरे, शेतकरी, ममदापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat Assault : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाण कोण? नेमकी कशामुळे केली मारहाण?

SBI ATM Rule: 1 ऑक्टोबरपासून ATMच्या नियमांत मोठा बदल! नियम समजून घ्या, नाहीतर भरावा लागेल चार्ज

Pune Traffic Update : पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल; ४-५ सप्टेंबरला ‘हे’ रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्गांची यादी पाहा

गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीला वेग, निकृष्ट कामावर उपमहापौरांचा दणका; सॅम्पल तपासणीचे निर्देश, बिल न काढण्याची सूचना

Mumbai-Goa Highway : पुढील 6 महिन्यांत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होणार! गणेशोत्सवाआधी 'हा' महत्त्वाचा पूल प्रवाशांच्या सेवेत; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT