Dr. Swati Khartode sakal
पुणे

Dengue : डेंग्यूच्या आजारात रक्तातील पेशी वाढविण्यासाठी पेरु जास्त उपयुक्त

डेंग्यूच्या आजारात रक्तातील पेशी वाढविण्यासाठी हिरव्या किवी फळापेक्षा ‘पेरू’चा जास्त उपयोग ठरल्याचे तुलनात्मक संशोधनातून झाले सिद्ध.

सम्राट कदम

पुणे - डेंग्यूच्या आजारात रक्तातील पेशी वाढविण्यासाठी हिरव्या किवी फळापेक्षा ‘पेरू’चा जास्त उपयोग ठरल्याचे तुलनात्मक संशोधनातून सिद्ध झाले आहे. सुमारे १०० रूग्णांवर केलेले हे संशोधन इंटरनॅशनल ‘जर्नल ऑफ फूड अँड नुट्रिशनल सायन्सेस’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

विश्वराज हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ डॉ. स्वाती खारतोडे यांनी हा तुलनात्मक अभ्यास केला आहे. त्या म्हणतात, ‘कोणत्याही विषाणुजन्य आजारामध्ये फळांचे खुप महत्व असते. क-जीवनसत्व हे पेशी वाढविण्यामध्ये अतिशय महत्वाचे असते. डेंग्युमध्ये पेशी कमी झाल्यावर आपल्याला सर्वाना किवी हे फळ आठवते, बरेचसे डॉक्टर्स आणि आहारतज्ञ देखील किवी खाण्याचा सल्ला देतात.

परंतु किवी हे फळ खुप महाग असते म्हणुन सर्वानाच परवडते असे नाही. किवीपेक्षा कितीतरी जास्त पटीने पेरु आणि आवळा यामध्ये जीवनसत्व क असते, परंतु आवळा हे ठराविक काळामध्येच मिळतो म्हणून आम्ही डेंग्युच्या रुग्णांमध्ये पेशी वाढविण्यासाठी किवी आणि पेरू यांच्या प्रभावाचे तुलनात्मक संशोधन केले.’ संशोधनासाठी विश्वराज हॉस्पिटल संशोधन विभागमधील डॉ. तबरेज पठाण, कोमल दुबाल आणि नम्रता सुर्वे यांनी सहभाग घेतला होता.

असे झाले संशोधन

- डेंग्यूमुळे पेशी कमी झालेले १०० रुग्ण निवडले गेले.

- ५० रुग्णांना हिरवे किवी फळ तर ५० रुग्णांना पांढरा गर असलेले पेरु खाण्यास सांगितले

- रोज त्यांच्या रक्तातील प्लेटलेटची मात्रा म्हणजेच पेंशीची संख्या तपासण्यात आली.

- संशोधनामध्ये सर्व वयोगटातील रुग्ण होते, जवळपास सर्वच रुग्णांना एकसारखी औषधे चालू होती.

- आहारही जवळपास एकसारखाच होता

- मिळालेल्या निरीक्षनांचे तुलनात्मक सांख्यिकीय विश्लेषण केले गेले.

आहारात पेरू घेणाऱ्या रूग्णांच्या गटामध्ये पेशी वाढण्याची (प्लेटलेटची संख्या) वाढती प्रवृत्ती दिसत होती. तर किवी गटामध्ये पेशी वाढण्याची प्रथम कमी प्रवृत्ती, नंतर वाढण्याची प्रवृत्ती आणि पुन्हा कमी होण्याची प्रव्रुत्ती होती. म्हणजेच पेशी वाढण्यामध्ये अनियमीतता होती. म्हणुनच किवी गटाच्या रुग्णांचा रूग्णालयात डिस्चार्ज देखील उशिरा झाला, त्याउलट पेरु गटामधील रुग्णांच्या पेशी लवकर वाढल्यामुळे त्यांचा हॉस्पिटलमधील डिस्चार्ज तुलनेने लवकर झाला.

- डॉ. स्वाती खारतोडे, आहारतज्ञ आणि संशोधक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT