पुणे

नावीन्यपूर्ण कंपन्यांसाठी ‘सहयोग’मध्ये मार्गदर्शन

सकाळवृत्तसेवा

पुणे - नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित ‘स्टार्ट-अप’ कंपन्यांना मार्गदर्शनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून दोन दिवसांची ‘सहयोग’ परिषद सुरू झाली. महाराष्ट्रातील स्टार्ट अप कंपन्या आणि महाविद्यालयांमधील इनोव्हेशन कक्षांचे प्रमुख परिषदेत सहभागी आहेत.

परिषदेचे उद्‌घाटन ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चे अध्यक्ष आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या हस्ते झाले. स्टार्ट अप कंपन्यांना पूरक अशी इकोसिस्टिम ‘डीसीएफ व्हेंचर्स’ने तयार केली असून, येत्या चार महिन्यांत ही व्यवस्था स्टार्ट अप कंपन्यांसाठी उपलब्ध होईल, अशी घोषणा पवार यांनी या वेळी केली. 

विद्यापीठातील सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्‍युबेशन ॲण्ड लिंकेजेस्‌ हे या परिषदेचे आयोजक आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर उद्‌घाटनप्रसंगी उपस्थित होत्या. 

पूरक वातावरण हवे
तरुणांच्या नावीन्यपूर्ण कल्पना ‘स्टार्ट-अप’ कंपन्यांमधून पुढे येत आहेत. ‘स्टार्ट-अप’ कंपन्यांना प्रोत्साहन, मार्गदर्शन, कौशल्यविकास आणि गुंतवणूक आवश्‍यक आहे. त्या कल्पनांचे व्यवसायात रूपांतर करण्यासाठी परिपूर्ण अशी इकोसिस्टिम हवी. ती ‘डीसीएफ व्हेंचर्स’ने तयार केली आहे, असे पवार यांनी सांगितले. पूरक वातावरण असल्याशिवाय स्टार्ट अप यशस्वी होत नाहीत, त्यामुळे पूरक वातावरणनिर्मितीचे काम फाउंडेशन करीत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

‘अयशस्वी होण्याची भीती बाळगू नका. अपयशही साजरे करता आले पाहिजे,’ असा सल्ला पवार यांनी स्टार्ट अप कंपन्यांना दिला. 

डॉ. नितीन करमळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘स्टार्ट-अप’ची उभारणी करताना येणाऱ्या समस्या कशा सोडवाव्यात, नावीन्यपूर्ण प्रकल्प प्रत्यक्षात कसे आणावेत, गुंतवणूकदार कसे शोधावेत, याविषयी परिषदेत मार्गदर्शन केले जात आहे.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अपुर्वा पालकर यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT