Pune  sakal
पुणे

Pune : लष्करातील जवानांना लाभले हठयोगाचे प्रशिक्षण ; ‘ईशा फाउंडेशन’चा उपक्रम,सद्‌गुरू यांचे मार्गदर्शन

लष्करातील जवानांसाठी ‘योगा फॉर स्ट्रेस मॅनेजमेंट अँड होलिस्टिक वेलनेस’ उपक्रमाचा समारोप सोहळा पुण्यात उत्साहात झाला. कॅम्पमधील मिल्खा सिंग क्रीडासंकुलातील सोहळ्यात ‘ईशा फाउंडेशन’चे संस्थापक सदगुरू यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी : लष्करातील जवानांसाठी ‘योगा फॉर स्ट्रेस मॅनेजमेंट अँड होलिस्टिक वेलनेस’ उपक्रमाचा समारोप सोहळा पुण्यात उत्साहात झाला. कॅम्पमधील मिल्खा सिंग क्रीडासंकुलातील सोहळ्यात ‘ईशा फाउंडेशन’चे संस्थापक सदगुरू यांनी मार्गदर्शन केले. नऊ राज्यांतील २३ ठिकाणी ११ हजारांहून जास्त जवानांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

सदर्न कमांडचे जनरल ऑफिसर-कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, लष्करातील शेकडो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. सदगुरू म्हणाले, ‘‘लष्करी प्रशिक्षणामुळे शरीर मजबूत होते, तर योगामुळे मन तसेच बुद्धी विकसित होते. त्यामुळे जवानांनी व्यग्र आणि तणावपूर्ण जीवनातून थोडा वेळ ध्यानधारणेसाठी द्यावा.’’

जैसलमेर, झाशी, ग्वाल्हेर, जामनगर, पुणे, सिकंदराबाद, बंगळूर, कोइमतूर, कन्नूर व इतर ठिकाणांहून सुमारे चाळीस हजार जवान सोहळ्यात ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले. अजय कुमार सिंग म्हणाले, ‘‘हठयोगाचे प्रशिक्षण घेतलेल्या सगळ्यांचे कौतुक आहे.

योगामुळे सैन्यातील तणावपूर्ण जीवनात मोठा बदल होत आहे. त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत योगाचा समावेश केल्याने अनेक सैनिकांना प्रशिक्षणादरम्यान शांत, तणावमुक्त होण्यास मदत झाली. हे प्रशिक्षण सगळ्या जवानांनी घ्यावे म्हणून सदर्न कमांड सहकार्य करेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, तासाभरात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप; काही ठिकाणी गारपीट

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाचा जोर ओसरला

RSS आणि बाबरी मस्जिद प्रकरणाचा अखेर उलगडा होणार, संजय दत्त समोर आणणार इतिहासाचा ‘आखरी सवाल’

SCROLL FOR NEXT