पुणे

भानुशाली खूनप्रकरणी दोघांना अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे - गुजरातमधील माजी आमदार व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंती भानुशाली खूनप्रकरणी गुजरात पोलिसांनी येरवडा परिसरातील दोन ‘शार्पशूटर्स’ना अटक केली. गुजरातचे भाजप नेते छबील पटेल हेच या खुनाचे सूत्रधार असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. या प्रकरणात पुण्यासह गुजरातमधील आणखी काहीजण ‘रडार’वर आहेत. भानुशाली खून प्रकरणाचे ‘पुणे कनेक्‍शन’ ‘सकाळ’ने २३ जानेवारीला उघड केले होते.

शशिकांत कांबळे व अश्रफ शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भानुशाली आठ जानेवारीला सयाजीनगर रेल्वेने भुजवरून अहमदाबादला जात असताना मालिका येथे त्यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून करण्यात आला. 

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच गुजरात पोलिसांचे पथक येरवड्यात ठाण मांडून होते. या पथकाने पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपींसंदर्भातील माहिती गोळा करण्यास सुरवात केली होती. चार ते पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दोन दिवसांपूर्वी कांबळे व शेख यांना सापुतरातून अटक केली. या दोघांनीच भानुशाली यांचा खून केल्याची कबुली दिली. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने अबडासामधून भानुशालींऐवजी काँग्रेसमधून आलेल्या छबील पटेलला उमेदवारी दिली. मात्र पटेल यांचा पराभव झाला. त्यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला होता. यातून पटेल याने भानुशालींना संपविण्यासाठी कांबळे व शेख यांच्याशी संपर्क साधला. तिघेही दोन महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये भेटले, त्या वेळी खुनासाठी ३० लाख ठरले. पटेलने पाच लाख आगाऊ दिले होते. कांबळे व शेख २७ डिसेंबरला अहमदबादला आले, पटेलच्या फार्म हाउसवर राहिले. त्यानंतर भानुशाली यांचा खून केला.

कोण आहेत कांबळे व शेख?
शशिकांत कांबळे व अश्रफ शेख हे दोघेही येरवड्यातील सराईत गुन्हेगार आहेत. विविध  गुन्हे त्यांच्या नावावर आहेत. दरम्यान शेख, कांबळे व त्यांचे अन्य साथीदार एका संघटनेचे काम करतात. या संघटनेतूनच त्यांची छबील पटेलशी ओळख झाली. दोघांसह आणखी काही जणांनी काही महिन्यापासून सातत्याने ‘पुणे-गुजरात’ विमान प्रवास करत होते. 

भानुशाली यांच्या खून प्रकरणात अटक केलेले दोघेही पुण्यातील येरवडा येथे राहणारे आहेत. छबील पटेल यानेच त्यांना भानुशालींच्या खुनाची सुपारी दिली होती. खून केल्यानंतर ते दोघे कुंभमेळ्यात गेले होते. त्यांना सापुतारात अटक केली, तर पटेल हा परदेशात पळून गेला आहे.  
- आशिष भाटिया, पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग (गुजरात)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT