मार्केट यार्ड , ता. २१ : गुलटेकडी मार्केट यार्डात रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यामुळे एका व्यक्तीचा उपचाराविना मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली. सोमवारी (ता. १९) सकाळी तीव्र पोटदुखीमुळे एका व्यक्तीची प्रकृती बिघडली, मात्र तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मार्केट यार्डात २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचा दावा केला जातो; पण प्रत्यक्ष गरजेच्या वेळी ती न मिळाल्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. हजारो लोकांची वर्दळ असणाऱ्या या आवारात आरोग्य सुविधा कुचकामी ठरल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
विशेष म्हणजे, या घटनेची माहिती दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याऐवजी सुरक्षारक्षकांना कळविण्यास सांगितल्याची माहिती समोर आली. चोवीस तासांच्या सेवेचा दावा केवळ कागदावरच असून, रुग्णवाहिका वेळेत का पोहोचली नाही आणि आपत्कालीन यंत्रणेने कोणती कार्यवाही केली, याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मार्केट यार्डात बाजार घटकांसाठी आरोग्यसेवा पुरवली जाते. काही परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित डॉक्टर बोलावून उपचार केला जातो. मात्र, मंदिरासमोर घडलेली घटना ही बेवारस मृत्यू आहे. भविष्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध राहील, यासाठी प्रयत्न केला जाईल.
- दिनेशसिंग चंदेल, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.