gunawadi gram panchayat election result victory for Jai Bhawani transformation Panel Sarpanch Prachi Ravindra Ghode Sakal
पुणे

गुणवडीत सत्ताधाऱ्यांचा पराभव; जय भवानी परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय, सरपंचपदी प्राची रविंद्र घोडे

प्राची रविंद्र घोडे घोडे यांची सरपंचपदी निवड झाली असून १७ पैकी १० जागा जिंकत सत्ता खेचून आणली

सोमनाथ भिले

डोर्लेवाडी :गुणवडी (ता.बारामती) येथील ग्रामपंचायतीच्या अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत जय भवानी परिवर्तन पॅनलने सत्ताधारी भवानीमाता विकास पॅनलचा मोठ्या फरकाने पराभव करून दणदणीत विजय मिळविला. प्राची रविंद्र घोडे घोडे यांची सरपंचपदी निवड झाली असून १७ पैकी १० जागा जिंकत सत्ता खेचून आणली.सत्ताधारी भवानीमाता पॅनलला ७ जागेवर समाधान मानावे लागले.

येथील निवडणुक अत्यंत चुरशीची झाली होती.सत्ताधारी भवानीमाता पॅनलने मागील पाच वर्षाच्या काळात केलेल्या विकासाच्या मुद्यावर प्रचार केला होता.तर विरोधी असलेल्या जय भवानी परिवर्तन पॅनलने सत्ताधारी यांनी ५ वर्षाच्या कार्यकाळात केलेली निकृष्ट कामे,भ्रष्टाचार,अपूर्ण विकासकामे आदी मुद्यांवर प्रचाराची राळ उठवून दिली होती.

त्याचा फायदा मतांमध्ये झालेला दिसला.प्राची रविंद्र घोडे यांनी सत्ताधारी भवानीमाता विकास पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार ज्योती संतोष भिसे यांचा पराभव करून विजयाची माळ आपल्या घाल्यात घातली.सत्ताधारी पॅनलचे प्रमुख व माजी सरपंच सतपाल महादेव गावडे हे सदस्यपदी निवडून आले मात्र त्यांना सत्ता राखण्यात अपयश आले.त्यांच्या पॅनलचे केवळ ७ उमेदवार निवडून आले.

राजेंद्र गावडे, भारत नाना गावडे, ऍड गुलाबराव गावडे, भारत पाटील गावडे, वैजनाथ गावडे, संजय फाळके, चंद्रकांत बांदल यांच्या नेतृत्वाखाली जय भवानी परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार-विशाल तुकाराम गावडे,नीलम राजेंद्र शिंदे,नवनाथ गोविंदराव गावडे,लक्ष्मण शहाजी भोसले,सायली शेखर पिसाळ,शैला मालाजी गावडे,ऋषिकेश संजय फाळके,करिष्मा सुयश गावडे,सुवर्णा सचिन घाडगे,अभिजीत दिवाणजी कांबळे हे विजयी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT