पुणे

पिस्तुलाचा धाक दाखवून घरात घुसले; मुलीचे जबरदस्तीने अपहरण आसू येथील धक्कादायक घटना; रोख रक्कम व सोन्याचे मंगळसूत्रही लुटले

CD

पिस्‍तुलाचा धाक दाखवत तरुणीचे अपहरण

आसूनजीक शिंदेनगरातील घटना; रोकडसह सोन्‍याचे मंगळसूत्रही लंपास

फलटण, ता. ५ : घरात प्रवेश करून चार तरुणांनी पिस्तूल व धारदार कोयते घेऊन झोपलेल्‍या व्यक्तींना पिस्‍तुलाचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर कपाटातील रोकड व सोन्याचे मंगळसूत्र घेऊन, कुटुंबातील तरुणीचे तोंड बांधून तिला जबरदस्तीने घराबाहेर ओढत मोटारीतून नेत, तक्रार दिल्यास तिला मारून टाकण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना आसू येथील शिंदेनगर परिसरात शनिवारी (ता. ३) रात्री दहाच्या सुमारास घडली.
शहाबाज अन्वर शेख, समीर आतार (पूर्ण नाव माहीत नाही), सद्दाम शमसुद्दीन शेख (दोघेही रा. बारामती, ता. बारामती, जि. पुणे), तसेच आमीर रेहमान पठाण (पत्ता माहीत नाही) या चौघांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजेंद्र मल्हारी निंबाळकर (वय ५५, रा. शिंदेनगर, आसू, ता. फलटण) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फलटण ग्रामीण पोलिस व फिर्यादीच्या तक्रारीनुसार, रात्री दहाच्या सुमारास संबंधित चौघे अचानक घरात घुसले. त्यावेळी शहाबाज शेखच्या हातात पिस्तूल, तर अन्‍य तिघांच्‍या हातात धारदार कोयते होते.
घरात शिरताच शहाबाजने राजेंद्र निंबाळकर यांच्या डोक्याला पिस्‍तूल लावून त्यांना मारहाण केली. त्यानंतर कपाट उघडून त्यातील २० हजार रुपये रोख व पत्नीच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र काढून घेतले. यावेळी सद्दाम शेख याने निंबाळकर यांच्या पत्नीला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, घरातील वातावरणाचा फायदा घेत चौघांनी निंबाळकर यांच्‍या मुलीला पकडत तिचे तोंड बांधून तिच्या इच्छेविरुद्ध तिला घराबाहेर ओढत नेले. त्यानंतर तिला पांढऱ्या रंगाच्या मोटारीत बसवून चौघे तेथून निघून गेले.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणाचा तपास करून संशयितांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक पवार अधिक तपास करीत आहेत.

....................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT