Guru Purnima Lonikand police provided school material and financial assistance to Anjit Khandagale student education Sakal
पुणे

Pune News : लोणीकंद पोलिसांकडून गरीब विद्यार्थ्याला मदतीचा हात

गुरूपौर्णिमेचे औचित्य साधत लोणीकंद पोलीस ठाण्यात त्याला बोलावून त्याला शालेय साहित्य व आर्थिक मदत केली.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : गुरू पौर्णिमेचे औचित्य साधत लोणीकंद पोलिसानी विष्णुजी शेकोजी सातव विद्यालयातील अंजित खंडागळे या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यास शालेय साहित्य व आर्थिक मदतीचा हात दिला. सातव विद्यालयात एका कार्यक्रमानिमित्त पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व रितेश काळे उपस्थित होते.

यावेळी अंजित याने भाषण केले. त्याचे भाषण ऐकून कोळपे व काळे हे दोघेही प्रभावित झाले. त्यांनी प्राचार्य अजिनाथ ओगले यांच्याकडे या विद्यार्थ्याबाबत चौकशी केली असता तो गरीब कुटुंबातील व हुशार असल्याचे ओगले यांनी सांगितले.

त्याला मदत करण्याचा निर्धार या दोघांनी केला होता. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधत लोणीकंद पोलीस ठाण्यात त्याला बोलावून त्याला शालेय साहित्य व आर्थिक मदत केली. या प्रसंगी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सीमा ढाकणे,

पोलीस निरीक्षक ( गुन्हे ),पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) मारुती पाटील, सायबर क्राईमचे उपनिरीक्षक सुरेश गोरे,सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरू, सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव,कुणाल सरडे,महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस ठाणे म्हटलं की भीती वाटायची. मात्र गुरू पौर्णिमेनिमित्त मला पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस काकांनी मला मदत केली. त्यामुळे भीतीही दूर झाली व मला गुरूंकडून मदत मिळाली. मदतीचा हाच हात मी ही पुढे करून भविष्यात गरजू गरिबांना मदत करेल. "

– अंजित खंडागळे, विद्यार्थी, सातव विद्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT