Gutkha 
पुणे

गुटखाबंदीची ‘ऐशी की तैशी’

दीपेश सुराणा

पिंपरी - राज्यात गुटखाबंदी लागू झाली असली तरीही शहरात छुप्या पद्धतीने गुटखा, सुगंधित मिक्‍स सुपारी, सुगंधित तंबाखू, पानमसाला यांची विक्री होत आहे. या व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला वाचविण्यासाठी गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. 

गुटखाबंदी कायद्यातील त्रुटींमुळे विक्रेत्यांचे फावत आहे. प्रतिबंधितीत गुटख्याच्या पुड्यांवर उल्लेख न करता त्याची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. त्याशिवाय, सुगंधी मिक्‍स सुपारी, सुगंधित तंबाखू, पानमसाला यांची सर्रास विक्री होत आहे. शहरामध्ये परराज्यांतून विशेषतः कर्नाटकमधून गुटखा विक्रीसाठी येत असल्याची माहिती आहे. पिंपरी, निगडी, भोसरी येथील बाजारपेठांमधून हा गुटखा शहरात वितरित केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

गुटख्याची अवैध विक्री करणाऱ्यांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाला (एफडीए) भारतीय दंड विधान संहिता (आयपीसी) अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही, असा औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांविरोधात ‘एफडीए’तर्फे गुन्हा दाखल केला जात आहे.

पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरात १७ सप्टेंबरपासून आतापर्यंत २ कोटी ९ लाख ५२ हजार रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी, पानमसाला जप्त केला आहे. ९ दुकाने आणि ११ वाहनांवर ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पिंपरी- चिंचवड परिसरातील ५० लाख ७९ हजार रुपयांच्या जप्त केलेल्या मालाचा समावेश आहे. गुटखा विक्रेत्यांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांची परवानगी घेऊन खटले दाखल केले जात आहेत.
- सुरेश देशमुख, सह-आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT