Gutkha pan masala worth Rs 31 lakh seized gutkha mafia arrested police action baramati Sakal
पुणे

Baramati Crime : गुटखा, पानमसाल्यासह सुमारे ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त; एका गुटखा माफियास अटक

उंडवडी सुपे (ता.बारामती) येथून गुटखा, एका चारचाकी वाहनसह सुमारे ३१ लाखांचा मुद्देमाल सुपे पोलीसांनी हस्तगत केला.

सकाळ वृत्तसेवा

सुपे : उंडवडी सुपे (ता.बारामती) येथून गुटखा, एका चारचाकी वाहनसह सुमारे ३१ लाखांचा मुद्देमाल सुपे पोलीसांनी हस्तगत केला. या प्रकरणी प्रशांत गांधी यास अटक केली असून, त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती सहायक पोलिस अधिक्षक दर्शन दुगड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या प्रकरणी गुटखा माफिया प्रशांत धनपाल गांधी (वय ४८, रा.लासुर्णे, ता.इंदापूर, जि.पुणे, सध्या रा. ऋषिकेश अपार्टमेंट, पेन्सील चौक, बारामती), निसार (रा.विजापूर, कर्नाटक पूर्ण नाव,पत्ता माहिती नाही), राहुल मलबारी (रा.यवत, ता.दौंड, जि.पुणे) यांच्या विरूद्ध सुपे पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अधिक माहिती देताना दुगड म्हणाले - गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोचणे शक्य झाले. सुरूवातीला त्याच्या बारामती येथील घराची झडती घेतली असता माल मिळाला नाही. उंडवडी सुपे येथील फार्म हाऊसमध्ये माल लपून ठेवल्याचे समजले.

तीथे अवैध सुगंधी पान मसाला व गुटखा आणि एक वाहन असा एकूण ३० लाख, ९८ हजार, ८२० रूपयांचा मुद्देमाल आरोपीसह ताब्यात घेतला. कसून चौकशी केल्यानंतर यवतला गुटखा नेत असताना गाडी नादुरूस्त झाल्याने फार्म हाऊसवर माल ठेवल्याची कबुली गांधी याने पोलीसांना दिली.

पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुपे पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरिक्षक योगेश घोडके, जिनेश कोळी, लेंडवे, देशमुख, हवालदार काळे, इंगवले, तुषार ढावरे, सुदर्शन डोळाळकर या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT