file photo
file photo 
पुणे

राजगुरुनगरमध्ये १ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त

राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर (पुणे) : अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दोन ठिकाणी छापा टाकून सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्याची कारवाई राजगुरुनगरमध्ये खेड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने केली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केल्यावर त्यांनी यासंदर्भात खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, येथील पाबळ रस्त्यावरील ए-वन एजन्सी या दुकानात अवैध गुटखा विक्री सुरु असल्याची खबर खेड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला रविवारी संध्याकाळी मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली, फौजदार आदिनाथ महानवर यांच्या नेतृत्वाखाली ए व्ही कालेकर, भाऊसाहेब ठोसर, राजेंद्र देवकाते, रुबीना शेख, मंगल वडेकर या पथकाने त्याठिकाणी छापा मारला आणि गुटखा जप्त केला. नंतर पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकास पाचारण केले. त्यांनी छापा मारु जप्त केलेल्या मालाचा पंचनामा केला आणि त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर यांनी याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, आरएमडी आणि विमल पानमसाला व त्यासोबत सेंटेड तंबाखू अशी पॅकेट्स मिळून 1 लाख 77 हजार 880 रुपयांचा प्रतिबंधित आणि आरोग्यास हानिकारक असा जप्त केलेला माल आहे. हा माल बाळगणाऱ्या तेजाराम वनाजी सोळंकी (वय ३८, रा. संकल्प डेव्हलपर्स बिल्डिंग, चव्हाण मळा, राजगुरूनगर) यास अटक करण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी खेड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश बडाख, पोलिस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ, संतोष मांडवे यांचे पथक गस्त घालत असताना त्यांनी वाडा रस्त्यावरील मोमीन ट्रेडर्स या दुकानातून २८२० रुपयांचा गुटखा जप्त केला. त्याचाही पंचनामा करून वंदना रुपनवर यांनी, गुटखा बाळगणाऱ्या तन्वीर युसुफ मोमीन (वय ४०, रा. मोमीन आळी, राजगुरूनगर) याच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तसेच दोघांचीही दुकाने 'सील' करण्यात आली आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप येळे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT