ग्वाल्हेर, ता. १८ (पीटीआय) : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील शीतला माता मंदिराबाहेर रविवारी पहाटे भरधाव ट्रकने अनेक भाविकांना चिरडत मंदिराच्या प्रवेशद्वाराला धडक दिली. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला, तर किमान २८ जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. ट्रकच्या धडकेमुळे मंदिराची भिंत कोसळली. जखमींपैकी चौघांची जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चिनोर रस्त्यावरील उताराजवळ ही दुर्घटना घडली. हा ट्रक पंजाबमध्ये नोंदणी केलेला असून प्रवेशबंदी असलेल्या क्षेत्रात शिरल्याने मंदिरातील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या ट्रकने अनेक भाविकांना आणि रस्त्यालगतच्या दुकानांना धडक दिल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराला धडक दिली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तपास अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ट्रकचे ब्रेक निकामी झाले असावेत. त्यामुळे चालकाने वाहनावरील नियंत्रण मिळविण्यासाठी घाईघाईने ट्रक डावीकडे वळवला असावा. ट्रक सरळ पुढे गेला असता, तर किमान ६०० ते ७०० भाविकांना त्याने चिरडले असते, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलिस पथके त्याचा शोध घेत आहेत. प्रवेशबंदी असलेल्या क्षेत्रात ट्रक शिरलाच कसा, असा प्रश्न विचारला असता, या प्रकरणातील त्रुटींची चौकशी केली जाईल, असे यादव यांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर मृतदेह आणि जखमींना ग्वाल्हेरमधील ट्रॉमा सेंटरसह विविध रुग्णालयांत हलविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.