पुणे

यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ज्ञानोत्सवाचे आयोजन

CD

‘यशोदा’मध्ये उद्यापासून ‘ज्ञानदीप दिन’ उपक्रम

सातारा, ता. १६ ः यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता. १८) संस्थेच्या सर्व शाखा व विभागांमध्ये ‘ज्ञानदीप दिन’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यानिमित्त प्रारंभी यशोदा माता यांच्या प्रतिमेचे पूजन, ग्रंथपूजन केले जाणार आहे. यशोदा परिवारातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे हितचिंतक यांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी स्वेच्छेने ग्रंथ भेट द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांकडून भेटस्वरूपात प्राप्त होणाऱ्या ग्रंथांचे संकलन करून त्यांचे प्रदर्शन संबंधित शाखा व विभागांच्या ग्रंथालयांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ‘ग्रंथ वाचा आणि ग्रंथ मिळवा’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे पुस्तक वाचून त्याचा सारांश स्वतःच्या शब्दांत हस्तलिखित स्वरूपात सादर करावयाचा आहे. सारांश सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रदर्शनातील त्यांच्या आवडीचे पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार आहे.
१८ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत महिनाभर ‘वाचन प्रेरणा अभियान’ राबविण्यात येणार आहे. या कालावधीत सर्वाधिक पुस्तके वाचून त्यांचे गुणवत्तापूर्ण सारांश सादर करणाऱ्या विद्यार्थ्याची निवड करून त्याला ‘उत्कृष्ट वाचक पुरस्कार’ दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी हस्तलिखित स्वरूपात सादर केलेल्या पुस्तकांच्या सारांशांचे संकलन करून त्यांचे ‘हस्तलिखित प्रकाशन’ करण्यात येणार आहे. अशा प्रकारे ‘ज्ञानदीप दिना’निमित्त यशोदा माता यांच्या प्रतिमेचे पूजन, ग्रंथपूजन, ग्रंथभेट, ग्रंथवाटप, पुस्तक वाचन, सारांश लेखन, उत्कृष्ट वाचक पुरस्कार आणि विद्यार्थ्यांच्या हस्तलिखितांचे प्रकाशन असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. संस्थेच्या सर्व शाखा व विभागांतील प्राचार्य, मुख्याध्यापक, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सहभागातून हा ज्ञानोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

PNE26W66058
डॉ. अजिंक्य सगरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Phuket Fire Tragedy : प्रसिद्ध पर्यटनस्थळी मध्यरात्री भीषण आगीचा तांडव! १०० बाईक्सच्या इंधनामुळे भडका, ११ जणांचा होरपळून मृत्यू; भारतीय पर्यटकांबाबत मोठी अपडेट

IND vs NZ: मैदानावर अनेक खेळाडू होते, पण तिरंग्यासाठी धावला फक्त सिराज! video पाहून तुम्हीही कराल कौतुक

Satara Politics: जो आपल्याला नडतो, त्याला सोडत नाही!’ मंत्री शिवेंद्रराजेंचे सूचक विधान; साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी दोन आरोपींच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Tur Crop: दुष्काळात कष्टातून फुलवले तुरीचे पीक! पाण्याचा केला काटकसरीने वापर; दोन एकरांत २० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा

SCROLL FOR NEXT