deve-gowda
deve-gowda 
पुणे

शेतकरी मेळाव्यासाठी देवेगौडा उद्या पुण्यात

सकाळवृत्तसेवा

पुणे - शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना व ग्लोबल ॲग्रो फाउंडेशन यांच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्‌घाटन माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ९) होणार आहे.

अल्पबचत भवन, विभागीय आयुक्त कार्यालय येथे हा मेळावा होणार असून, या वेळी शेतकऱ्यांच्या समस्या विविध मार्गाने मांडणाऱ्या व सोडविणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच या वेळी ‘का होत आहेत शेतकरी आत्महत्या’ आणि ‘काय आहे डॉ. स्वामिनाथन समितीचा अहवाल’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन देवेगौडा यांच्या हस्ते होणार आहे. हा मेळावा डॉ. डी. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे ग्लोबल ॲग्रो फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात राज्यभरातील पाच हजारांपेक्षा जास्त शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले. या वेळी न्या. जी. डी. इनामदार, नंदा जाधव, विजय नहार, आनंद यादव, न्या. बी. आर. पाटील आणि बाळासाहेब काळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT