HA Retired Employees Question about not getting benefits retirement 
पुणे

'व्हीआरएस'साठी सर्व लाभ, मग आमची परवड का? एचए सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सवाल

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : "हिंदुस्थान एंटिबायोटिक्स (एचए) कंपनीतील स्वेच्छा निवृत्ती धारक कामगारांना त्यांची सर्व देणी देण्यात आली. मग, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे काहीच नाही. हा कुठला न्याय आहे", असा सवाल एचए सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने केला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

संघटनेचे अध्यक्ष दिपक आचरेकर यांनी म्हटले आहे की, "केंद्र सरकारने एचए कंपनीला नुकतीच २८० कोटी रुपयांची मदत केली. त्यामधून कामगारांची सर्व थकीत देणी देण्यात आली. स्वेच्छा निवृत्तीधारक कामगारांना ग्रॅच्युटी, रजेचे पैसे, प्रवास भत्ता आदी सर्व लाभ एकरकमी देण्यात आले. कंपनीकडे अद्याप पैसे शिल्लक असल्याने तिसऱ्या टप्प्यातील व्हीआरएस लवकरच लावली जाणार आहे. परंतु, गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित सुमारे ३०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्याचे नाव कंपनी घेत नाही.

कंपनी व्यवस्थापनाने आमची देणी देण्यासाठी सरकारकडे यापूर्वी प्रस्ताव पाठविला असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर, जमीन विक्री मधून आमची देणी देण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले आहे. यातील नेमके खरे काय आहे? गेल्या वर्षांचा अनुभव पाहता जमीन विक्री केवळ मृगजळ ठरेल. सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी एकूण मिळून केवळ ४० ते ५० कोटी रुपये इतकीच आहे. ही रक्कम स्वतः च्या हयातीत मिळेल काय? याच्या चिंतेत सेवानिवृत्त कर्मचारी आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT