hindustan antibiotics 
पुणे

‘एचए’ स्वेच्छानिवृतीधारकांना दीडपट रक्कम मिळणार

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - हिंदुस्थान एन्टिबायोटिक्‍स (एचए) कंपनीतील सुमारे १०४  स्वेच्छानिवृत्तीधारक कामगारांना ‘व्हीआरएस’पोटी दीडपट रक्कम देण्याला कंपनी व्यवस्थापनाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. दहा दिवसांत ही रक्कम दिली जाणार आहे. उर्वरित देणीदेखील ३१ जानेवारीपर्यंत दिली जातील, असे आश्‍वासन व्यवस्थापनाने दिले आहे.

एचए कंपनीमधील २५० स्वेच्छानिवृत्तीधारक कामगारांपैकी १०४ कामगारांना ‘व्हीआरएस’पोटी दीडपट रकमेऐवजी एकपटच रक्कम दिल्याने व्यवस्थान आणि स्वेच्छानिवृत्तीधारक कामगारांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. एचए मजदूर संघ (एचएएम) कडून व्यवस्थापनाला सर्व देणी देण्याबाबत दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यावर व्यवस्थापनाने अखेर सामंजस्याची भूमिका घेत ‘व्हीआरएस’ची उर्वरित रक्कम देण्यास मान्यता दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एचए मजदूर संघाचे सरचिटणीस संजय भोसले म्हणाले, ‘‘येत्या ८ ते १० दिवसांत १०४ कामगारांना ‘व्हीआरएस’च्या एकपट ऐवजी दीडपट रक्कमा देण्यास तत्त्वतः मान्य केले आहे. आवश्‍यक (एनडीसी) प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील आठवड्यापासून ग्रॅच्युइटीचेही धनादेश मिळण्यास सुरवात होणार आहे.’’

माजी सरचिटणीस अरुण बोऱ्हाडे म्हणाले, ‘‘रजा रोखीकरणाच्या रकमा निश्‍चित करण्यात काही त्रुटी राहिल्या होत्या. त्यातही सुधारणा केल्या जाणार आहेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Toxic Liquor: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत गदारोळ; सरकार संवेदनशील नसल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचाही उलटवार

Shaktipeeth Highway Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तिपीठविरोधात ठराव; काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध

कालीन भैया-गुड्डू पंडित पुन्हा आमनेसामने! 'मिर्झापूर'चा रक्तरंजित खेळ आता थिएटरमध्ये; 4 सप्टेंबरला होणार मोठा धमाका

Hasan Mushrif Gokul Election Controversy : हसन मुश्रीफांची जीभ घसरली; प्रशासक मंडळाला धरले धारेवर, ठरावात संकलनावेळी गोंधळ, असं काय बोलले?

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

SCROLL FOR NEXT