हडपसरच्या एस. एम. जोशी कॉलेजमध्ये झाले आंतरराष्ट्रीय वेबिनार  sakal
पुणे

हडपसरच्या एस. एम. जोशी कॉलेजमध्ये झाले आंतरराष्ट्रीय वेबिनार

ऊर्जेचे संवर्धन होणे, ही आता काळाची गरज

कृष्णकांत कोबल

हडपसर : ऊर्जेचे संवर्धन होणे, ही आता काळाची गरज आहे. त्यावर अधिकाधिक संशोधन होऊन त्याला चालना मिळायला हवी. हे करीत असताना ऊर्जा व त्याचे जतन करण्यासाठी लागणाऱ्या उपकरनाबाबतही जागृती झाली पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी व्यक्त केले. येथील एस. एम. जोशी महाविद्यालयात भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक सायन्स व आय. क्यू.ए. सी. यांच्या वतीने "ऊर्जा संवर्धन व नवीन संशोधन' या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित केला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शाळीग्राम बोलत होते. दक्षिण कोरियाचे डॉ. यंग पाक ली प्रमुख पाहुणे म्हणून हे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी प्रास्ताविक केले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सुरतचे डॉ. निशाद देशपांडे, साऊथ कोरियाचे डॉ. संभाजी शिंदे, डॉ. नागेश मौले, लंडनचे डॉ. सचिन सेंदिया यांनी यावेळी उर्जेविषयी सखोल मार्गदर्शन केले.

शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रोफेसर डॉ. प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत वेबिनारचा समारोप झाला. ते म्हणाले, "आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन होणे आवश्यक आहे. काळाची गरज म्हणून ऊर्जा स्रोतांवर संशोधन झाले पाहिजे. ऊर्जाक्षेत्रात जगभरातील संशोधकांनी केलेले संशोधन अतिशय उपयुक्त आहे. वेळोवेळी त्याचा अभ्यास झाला पाहिजे.' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय ढोले म्हणाले, "अशा आंतरराष्ट्रीय वेबिनारमधून ऊर्जा क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळेल.'

डॉ. किशोर काकडे, डॉ. रत्नमाला वाघमोडे, प्रा. मोहनसिंग पाडवी, प्रा. महेश बागल, प्रा.विनोद लोहार, प्रा. हेमंत देव, प्रा. शीतल कानसकर, प्रा. जयश्री कंधारे यांनी संयोजन केले. उपप्राचार्य प्रा. संजय जडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT