pune sakal
पुणे

हडपसर: फुरसुंगी शेवाळेवाडी येथे घरफोडी

संपुर्ण कुटुंब बाहेरगावी फिरायला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी एकाकी बंगल्याची घरफोडी करून १५५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ८८.३८ लाख रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

हडपसर : संपुर्ण कुटुंब बाहेरगावी फिरायला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी एकाकी बंगल्याची घरफोडी करून १५५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ८८.३८ लाख रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे. फुरसुंगी शेवाळेवाडी येथे ९ ते १८ ऑगष्ट दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक वसंतराव चोरघडे (वय ४७ रा. शेवाळवाडी, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे.

चोरघडे ९ ऑगष्ट रोजी कुटुंबातील सर्व व्यक्तींसह बाहेर गावी फिरायला गेले होते. गुरुवारी (ता. १९) दुपारी ते प्रवास करून बंगल्यावर आले असता बंगल्याचा दरवाजा उघडा दिसला. आतमध्ये प्रत्येक खोली तपासताना त्यातील प्रत्येक कपाट फोडल्याचे दिसले. त्यातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. कपाटातील लॉकर फोडून सोन्याचे दागिने, चांदी, रोख रक्कम गायब झाल्याचे दिसले. घरफोडी होऊन चोरी झाल्याची खात्री झाल्यावर चोरघडे यांनी पोलिसांमध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली.

याबाबत पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरघडे कुटुंब बाहेरगावी गेल्यानंतर नऊ दिवसांच्या कालावधीत ही घरफोडी झाली आहे. हा बंगला एकाकी असल्याने त्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. चोरट्यांनी बंगल्यातून एकशे पंचावन्न तोळे सोन्याचे दागिने, रुबी, नीलम डायमंड, साडे वीस किलो चांदीचे भांडे, परदेशी चलन मध्ये यूएस डॉलर, युरो, दिराम असे परदेशी चलन व रोख रक्कम असा एकूण ८८ लाख ३८ हजार रुपये किंमतचा ऐवज लांबविला असल्याची चोरघडेंची तक्रार आहे.

दरम्यान, घटनास्थळी सह पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, हडपसर पोलीस दरोडा पथक व गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलीस पथकाने पाहणी करून माहिती घेतली आहे. बंगल्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च केले आहेत. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. सुरक्षारक्षक व सीसीटीव्हीची गरज असतानाही मालकाने त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. यातून इतरांनी बोध घेण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

शिवराज्याभिषेक करणाऱ्या गागाभट्टांचे वंशज आता काय करतात? त्यांनी जपलेली छ. शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे पाहिलीत का?

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये गेल्या 15 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प

Share Market Fraud : सावध व्हा! नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली २७ लाखांना चुना; बापलेकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT