Hadapsar flyover Peddlers Pathariwale sakal
पुणे

उड्डाण पुल बंद असल्याने गर्दीतही फेरीवाले-पथारीवाले रस्त्यावर

अतिक्रमणच्या आतबट्ट्याच्या व्यवहार डोळ्यात तेल घालून वाहनचालक हाकतात वाहने

सकाळ वृत्तसेवा

पुणे : हडपसरमधील उड्डाण पुल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे रस्त्यावर वाहनांची खच्चून गर्दी असल्याने डोळ्यात तेल घालून वाहन चालवावे लागत आहे. तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये गाडीतळ ते मंडई दरम्यान पुण्याकडे जाणाऱ्या पदपथ आणि रस्त्यावर पथारीवाले आणि भाजीविक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे की आतबट्ट्याच्या व्यवहारामुळे पथारी-भाजीविक्रेत्यांनी दुकाने थाटली, असा संतप्त सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला.

हडपसर उड्डाण पुल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे हडपसर गाडीतळ ते गांधी चौक दरम्यान रात्रंदिवस रस्त्यावर वाहनांची खच्चून गर्दी आहे. उन्हाचा तडाका, वाहनांची गर्दी, ध्वनी आणि वायूप्रदूषणामुळे वाहनचालक त्रासले आहेत. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई त्यातच एखाद्या पादचाऱ्याला रस्ता ओलांडताना कसरत करावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुले आणि अपंगांनी तर घराबाहेरच पडायचे नाही, असा अलिखित फतवाच सरकारने काढला आहे का, असा संतप्त सवाल वृत्तपत्र विक्रेत्या नीलिमा बढे यांनी उपस्थित केला.

दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे. नेहमीपेक्षा एक तास घरातून लवकर निघूनही परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचताना नाकीनऊ येत आहेत, असे स्वामिनी कांबळे या विद्यार्थिनीने सांगितले.

रुग्णवाहिका वाहतूककोंडीत अडकल्याने उपचाराविना रुग्णाची तडफड होत आहे. अनेक दुकानदारांनी ग्राहकांना येण्यासाठी रस्ता नसल्याने दुकाने बंद ठेवली आहेत. उड्डाण पुलाखाली बसविलेल्या पथारीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. उड्डाण पुलाच्या दुरुस्तीची गती वाढवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी सामान्यजणांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agriculture News : नाशिकमध्ये अतिवृष्टीचा कहर! २.६५ लाख हेक्टर शेतीचं नुकसान, ४२५ कोटींची प्राथमिक भरपाई

Gold Rate Today : सोन्याच्या भावात पुन्हा अचानक वाढ ! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

'तो अंगावर धावून आला आणि...' आदिश वैद्यनं सांगितलं 'आई आणि बाबा रिटायर...' मालिका सोडण्याचं कारण, म्हणाला... 'सगळ्यासमोर शिव्या...'

Sanjay Kaka Patil : संजय काका पाटील, अजित दादांची साथ सोडणार? संवाद मेळाव्यात संकेत

Mahavitaran Strike: वीज कर्मचारी संघटनांचा आजपासून तीन दिवस संप; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

SCROLL FOR NEXT