घोरपडी, ता. १ : हडपसर औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित आणि गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्योग क्षेत्राचा विस्तार होत असताना मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल नागरिक व उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
रस्त्यांची दुरवस्था, अस्वच्छता, सुरक्षिततेचा अभाव, अपुरा पाणीपुरवठा, कचरा डेपोचा वाढता त्रास, अनधिकृत स्टॉल्स, पावसाळ्यात कंपन्यांमध्ये घुसणारे पाणी, मद्यपान करणाऱ्यांचा उपद्रव, भटक्या कुत्र्यांची समस्या, रात्रीच्या चोरीच्या घटना तसेच बंद पडलेले पथदिवे, सांडपाणी वाहिनीचे पाणी यासारखे प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले. तसेच औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रहिवासी वसाहती वाढत असून त्यावर बंदी यावी. तसेच रेल्वे फाटक दिवसातून तब्बल १२ वेळा बंद होत असल्याने उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गाची मागणीही करण्यात आली.
बैठकीत नगरसेवक प्रशांत जगताप, किशोर धायरकर, सुरेखा कवडे, कालिंदा पुंडे, हेमलता मगर, कोमल शेंडकर, हिमाली कांबळे, प्रशांत तुपे, खंडू लोंढे, साहिल केदारी, उमेश गायकवाड सत्कार करण्यात आला. यावेळी हडपसर औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष जयसिंग संपत, एम. ए. तेजवानी, प्रवीण खेडेकर व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
मागील २० वर्षांपासून कचरा डेपोविरोधातील लढा सुरू आहे. यामुळे बोअरवेलचे पाणी दूषित झाले आहे. नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी एका वर्षात पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. ती मागणी अजूनही पूर्ण झाली नाही.
- ॲड. चारु नारगोलकर, स्थानिक नागरिक
मूलभूत प्रश्नांसोबत अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करून व सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. तसेच इंडस्ट्रिअल टू रेसिडेन्शियल होऊ नये आणि कचरा डेपो हटवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यात येतील.
- प्रशांत जगताप, नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.