Metro 
पुणे

हडपसरला पुढच्या टप्प्यात मेट्रो

सकाळवृत्तसेवा

हडपसर - ‘‘पुढच्या टप्प्यात हडपसरला नक्कीच मेट्रो आणली जाईल. ससाणेनगर येथील भुयारी मार्ग अभ्यासपूर्वक उभारला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात भुयारी मार्गासाठी निधी नेमका कोठे खर्च झाला, याचा शोध घेऊ,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. 

ससाणेनगर-सय्यदनगर येथे रेल्वे फाटकाजवळ होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भुयारी मार्गाचे भूमिपूजन नुकतेच झाले. या वेळी ते बोलत होते. आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक उज्वला जंगले, रंजना टिळेकर, नगरसेवक संजय घुले, वीरसिंह जगताप, सुभाष जंगले, भूषण तुपे, संदीप शेंडगे, वैभव माने, राजू केकाण आदी उपस्थित होते. 

आमदार टिळेकर म्हणाले, ‘‘वाहतूक कोंडी फुटत नसल्याने हे दोन भुयारी मार्ग करण्याचा निर्णय घेतला. खासदार आढळराव पाटील मला पोरकट म्हणतात; पण मी मांजरीचा उड्डाण पूल, लुल्लाणनगरचा पूल मंजूर करून घेऊन त्यासाठी निधी आणला. हा पोरकटपणा असेल, तर मी तो वारंवार करीत राहील.’’ 

श्रेय लाटण्यासाठी भूमिपूजन - ससाणे
भुयारी मार्गाचे भूमिपूजन महापालिकेतर्फे करण्यात आले नाही. आमदार टिळेकर यांनी या कामाचे श्रेय लाटण्यासाठी हे भूमिपूजन केले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी केला. महापालिका सभागृहात या कामाचे अधिकृत भूमिपूजन करण्यात यावे, याबाबतचा ठराव मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

नगरसेवकांची अनुपस्थिती
भाजप नगरसेवक, कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांचे नगरसेवक या कार्यक्रमाला गैरहजर होते. भाजपचे नगरसेवक मारुती तुपे, ॲड. विकास रासकर, जीवन जाधव, माउली कुडले हे या कार्यक्रमाला गैरहजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली बनकर, नगरसेवक आनंद आलकुंटे, योगेश ससाणे, नंदा लोणकर, शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे, प्राची अल्हाट हेदेखील 
या वेळी अनुपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT