हडपसर - उड्डाण पुलाखालील ‘वटछाया’चे उद्‌घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. हा हरित प्रकल्प २८ हजार चौरस फुटांवर पसरलेला असून, खांबांना सावली देणाऱ्या वडाच्या झाडाचे चित्ररूप दिले आहे. उद्‌घाटन झाल्यानंतर टिपलेले छायाचित्र. 
पुणे

हडपसरमधील उड्डाण पुलाखाली ‘वटछाया’ साकारली

सकाळवृत्तसेवा

पुणे -  हडपसर उड्डाण पुलाखाली प्रिन्सिपल ग्लोबल सर्व्हिसेस आणि जुम्बिश क्रिएशन्सच्या वतीने साकारण्यात आलेल्या ‘वटछाया’ या ‘फ्लायओव्हर आर्ट इन्स्टॉलेशन्स’चे उद्‌घाटन शनिवारी अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी प्रिन्सिपल पुणेचे व्यवस्थापकीय संचालक कौशिक मजुमदार, आमदार योगेश टिळेकर, मगरपट्टा सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे संचालक उमेश मगर आदी उपस्थित होते.हडपसर पुलाखालील हा हरित प्रकल्प २८ हजार चौरस फुटांवर पसरलेला आहे. उड्डाण पुलाच्या खांबांना सावली देणाऱ्या मोठ्या वडाच्या झाडाचे चित्ररूप दिले आहे, तर पुलाखालील छताला हरित आच्छादनाचा वेढा देण्यात आला आहे. शहरी भागात वृक्षसंवर्धनाचा संदेश पसरविणे हा मूळ उद्देश असून, हे देशातील सर्वांत मोठे फ्लायओव्हर आर्ट इन्स्टॉलेशन्स असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

या वेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘‘वटछाया ही कलाकृती स्वच्छ भारत अभियानाला चालना देईल. उड्डाण पुलाखालील जागेला कलाकृतींमध्ये बदलण्यासारखे उपक्रम स्वच्छतेसोबतच शहराला सुंदर रूप देण्याची खात्री देतील. सौंदर्य व स्वच्छतेबाबत संदेश पसरविण्यासाठी उड्डाण पूल हा एक उत्तम पर्याय आहे. एखादी कलाकृती दिसली तर तिथे लोक कचरा टाकणे टाळतील आणि परिसर स्वच्छ राहील. स्थानिक कलाकार व कारागिरांनी हा संपूर्ण प्रकल्प तयार केला आहे. त्यातून कलाकारांना कलेसोबत रोजगारदेखील मिळाला आहे.’’

या संदर्भात प्रिन्सिपल पुणेचे व्यवस्थापकीय संचालक मजुमदार म्हणाले,‘‘ स्वच्छ भारत ही मोहीम आमच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी (सीएसआर)चे धोरण आहे. स्वच्छतेसोबत समाजाच्या दृश्‍य सौंदर्यामध्ये वाढ करण्यासाठी ही कलाकृती साकारली आहे.’’ जुम्बिशचे संस्थापक व मुख्य विश्‍वस्त म्रिधा म्हणाले, ‘‘हडपसर उड्डाण पूल प्रकल्प हा लाइट हाउस प्रकल्पाचे विस्तारीकरण म्हणून पाहतो. तरुणांना लाभदायी कौशल्ये देण्यासोबतच आपल्या दृश्‍य सौंदर्यासह सकारात्मक परिसर निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'तू माझ्यासाठी सर्वात मौल्यवान...'; कतरिना कैफची पोस्ट चर्चेत, मुलगा विहानची सुद्धा दाखवली झलक

IND vs ENG: भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर; टॉसनंतर Playing XI जाहीर

Live Updates Marathi: एकनाथ शिंदे यांचा चंद्रभागेत नौकविहार

Maharashtrian Recipe: तिखट खायला आवडतं? घरीच बनवा झणझणीत,सुकी लाल मिरची चटणी!

FIFA World Cup 2026 Final: अर्जेंटिनाचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य! फायनलआधी रॉड्रीने उघड केला स्पेनच्या विजयाचा सीक्रेट प्लॅन

SCROLL FOR NEXT