Pune Hailstorm Video 
पुणे

Pune Hailstorm Video : पुण्यातही बरसल्या गारा! वादळी वाऱ्यासह पावसाचाही तडाखा

Sandip Kapde

राज्यात गेल्या काह दिवसांपासून सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. दरम्यान आज पुण्यात गारा बरसल्या आहेत. पुण्यातील कोथरूड परिसरात जोरदार गारा पडल्या. यासोबत पावसाचाही तडाखा बसला आहे. विजांचा कडकडाटासह जोराचा वारा देखील सुरू आहे. 

पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आजपासून (११ एप्रिल, मंगळवार) सुरू होणारा हा अवकाळी पाऊस पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह अनेक भागात पडणार आहे. 

गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत पुणे हवामान खात्याने (आयएमडी) आजपासून पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवत पुन्हा एकदा तणाव वाढवला आहे.

१३ आणि १५ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT