आळेफाटा, ता. २३ ः आळेफाटा (ता. जुन्नर) येथील अनंतराव कणसे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल आणि सुमन व्यसनमुक्ती व मानसिक आजार उपचार केंद्र यांच्या विशेष सहयोगाने महिलांसाठी व्याख्यान तसेच हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. सरस्वती कणसे व डॉ. योगेश्री कणसे या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सरस्वती कणसे म्हणाल्या की, ‘‘हळदी-कुंकू हा पवित्र कार्यक्रम केवळ एक परंपरा नसून सौभाग्यवतींना सन्मान देणारी सुंदर प्रथा आहे. आज माझी प्रत्येक सखी चूल आणि मूल यांपलीकडे जाऊन समाजामध्ये स्वतःच्या पायावर कणखरपणे उभी आहे. आजची महिला ही अबला नाही तर सबला व सक्षम आहे हे दाखवून देण्याची ताकद व प्रोत्साहन तिच्यामध्ये निर्माण व्हावे यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.’’ तर, ऋषी साबळे यांनी उपस्थित महिलांना व्यायामाचे महत्त्व पटवून देणारे आरोग्यदायी व बुद्धीला चालना देणारे आगळेवेगळे खेळ घेतले. या कार्यक्रमात सुमन पुनर्वसन केंद्राच्या महिला सदस्य व अनंतराव कणसे महाविद्यालयाच्या व हॉस्पिटलच्या सर्व महिला शिक्षक यांनी सहभाग घेतला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.