पुणे

दिव्यांग बनविणार 5 लाख मास्क; दीड हजार जणांना रोजगार

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या संकटाने आपले जगणे हरवून बसलेल्या पुण्यातल्या दीड हजार दिव्यांगांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ देण्यासाठी त्यांच्याकडून सुमारे पाच लाख मास्क तयार करून घेण्यात येणार आहेत. हे मास्क छोट्या उद्योगातील कामगारांना माफक दरात पुरविले जाणार आहेत. यातून दिव्यांगांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 

कोरोनासोबत जगताना एकमेकांना मदतीचा हात देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यासाठी बडवे इंजिनिअरिंग आणिदिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीने (डिक्काई) पुढाकार घेतला आहे. दिव्यागांसाठी सोयी-सुविधा असलेली पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका सहकार्य करणार आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीसह पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भागांतील दिव्यांगांना या उपक्रमात सामावून घेण्यात येणार आहे. 

लॉकडाउनमुळे गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून दिव्यांगांचे छोटे-मोठे व्यवसायही बंद आहेत. परिणामी त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस परिस्थिती बदलण्याची शक्‍यता नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडण्याची भीती आहे. या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठांमधील सध्याची मागणी लक्षात घेऊन दिव्यांगांकडून कापडी मास्क तयार करण्याची संकल्पना बिडवे इंजिनिअरिंग आणि डिक्काईने पुढे आणली आहे. 

या उपक्रमातून दिव्यांगांना घरात रोजगार मिळणार असून त्यांच्याकडील मास्क लगेच कंपन्यांना पुरविण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. कमीत-कमीत खर्चात मास्क तयार करून ते कामगारांपर्यंत पोचविले जाणार आहेत, असे डिक्काईच्या कार्याध्यक्ष नीलिमा येमूल यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

-पाच लाख कापडी मास्कची निर्मिती 
-उद्योगातील गरजू कामगारांना माफक दरात मास्क 
-पुढील तीन-चार महिने उपक्रम सुरू राहणार 
-दिव्यांग महिलांना प्राधान्य 

पुणे महापालिका करणार सहकार्य 
दिव्यांगांपुढच्या अडचणी सध्या वाढल्याने त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी पुणे महापालिकेकडून पायाभूत सुविधा पुरविल्या जातील. पहिल्या टप्प्यात जागा उपलब्धता करून देण्यात येईल. त्यांनी तयार केलेले मास्क महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी देखील खरेदी करण्यात येतील, असे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. 

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्क वापर करावा लागेल. सध्या मास्क घालणे गरजेचे आहे. ही गरज रोजगार उपलब्ध करीत आहे; त्यातून दिव्यांगांच्या हातांना काम मिळेल. त्यांनी तयार केलेले मास्क गरजूंना परवडणाऱ्या भावात पुरविले जातील. 
श्रीकांत बडवे, व्यवस्थापकीय संचालक, बडवे इंजिनिअरिंग 

शारीरिक मर्यादेमुळे सध्या ज्यांना घराबाहेर येणे शक्‍य नाही, अशांना विशेषतः दिव्यांग महिलांना या उपक्रमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य राहील. या घटकातील प्रत्येक गरजूंना पुढचे तीन महिने काम मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
सुप्रिया बडवे, समन्वयक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protests: नेपाळची संसद विसर्जित; सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान

Shiv Sena UBT Demand : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने केली मोठी मागणी!

SSC Exam Form : दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून होणार सुरू

Vasmat Heavy Rain : वसमतला ढगफुटी सदृश्य पाऊस! शेतशिवाराला नद्यांचे स्वरूप; आखाडे गेले वाहून, पाच गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates Live : न्यायाधीशांच्या कारला आग, सुदैवाने इजा नाही

SCROLL FOR NEXT