Sangita-Tiwari 
पुणे

2 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी द्या

निलेश बोरुडे

किरकटवाडी - सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूस मालखेड-थोपटेवाडी (ता. हवेली) रस्त्यावरील पुलाखाली मृतदेह मिळालेल्या दोन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे व त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संजय बबन काटकर (वय 38, रा.  कादवे ता. वेल्हे, जि.पुणे) या नराधमाला रायगड जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चिमुरडीवर झालेल्या अत्याचारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून सिंहगड परिसर सुन्न झाला आहे.  दरम्यान,  2 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला फाशी द्या अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगिता तिवारी यांनी केली आहे. कुरण येथील कातकरी वस्तीवर जाऊन तिवारी यांनी पिडीत कुटुंबाची भेट घेतली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

15 फेब्रुवारी रोजी पानशेत जवळील कुरण खुर्द (ता. वेल्हे जिल्हा पुणे) येथे आपल्या घरासमोर खेळत असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील दोन वर्षांच्या मुलीचे एका अज्ञात व्यक्तीने रिक्षातून अपहरण केले होते. याबाबत वेल्हे पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली होती. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलीला मालखेड परिसरात घेऊन आल्याचे समजताच वेल्हे व हवेली पोलिस ठाण्याकडून कसून शोधकार्य सुरू होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख हे स्वतः मलखेड परिसरात 16 फेब्रुवारी रोजी तपासावर लक्ष ठेवून होते.

श्वानपथक व पुणे ग्रामीण पोलीस दलातील शेकडो पोलीस कर्मचारी मालखेड व आजूबाजूचा परिसर पिंजून काढत असताना मालखेड-थोपटेवाडी रस्त्यावरील पुलाखाली चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालातून या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. आरोपीच्या शोधासाठी वेल्हे, हवेली, राजगड, भोर आणि पौड पोलिस ठाण्यांची मिळून एकूण अकरा तपास पथके तैनात करण्यात आली होती. या नराधमाला रायगड जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चिमुरडीवर झालेल्या अत्याचारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून सिंहगड परिसर सुन्न झाला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT