पुणे

तीन बुडाले

CD

होडी उलटून
दोन मुलींचा मृत्यू
बीड, ता. १६ : मासेमारीची होडी तलावात उलटल्याने दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना धारूर तालुक्यातील हिंगणी येथे शनिवारी सकाळी घडली. पलक शामराव पारवे (वय १४, रा.हिंगणी ) आणि दिव्या विकास कांबळे (रा. कासारवाडी, ता. परळी) अशी मुलींची नावे आहेत.
मत्स्य व्यवसाय करणाऱ्या पारवे कुटुंबातील पलक, दिव्या, मोहिनी, तन्वी आणि जान्हवी या पाच मुली शनिवारी सकाळी हिंगणी तलावावर गेल्या होत्या. यातील पलक, दिव्या आणि मोहिनी या तिघी किनाऱ्यावर असलेल्या मासेमारीच्या होडीवर बसल्या. मात्र, होडी अचानक उलटली आणि तिघीही पाण्यात बुडू लागल्या.
मोहिनीला पोहता येत होते, मात्र, पलक आणि दिव्या यांनी घाबरून तिला घट्ट पकडल्याने तीही बुडू लागली. काठावरील मुलींच्या आरडाओरड्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेत तिघींना बाहेर काढले. मोहिनी शुद्धीवर आली, मात्र पलक व दिव्या यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT