Hapus-Pune-Market 
पुणे

आंबा प्रेमींसाठी गोड बातमी; पुणे मार्केट यार्डात हापूसची एन्ट्री!

सकाळ वृत्तसेवा

Hapus Mango: मार्केट यार्ड (पुणे) : आंबा हे सर्वांच्याच आवडीचे फळ आहे. त्यामुळे आंब्याच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता असते. ही उत्सुकता लवकरच संपणार आहे. कारण पुणे मार्केटयार्डमध्ये हापूसने (Alphonso) एन्ट्री घेतली आहे. सध्या अधूनमधून बाजारात हापूसची आवक होत आहे. मंगळवारी मार्केट यार्डातील फळ विभागात हापूसच्या 15 पेट्यांची आवक झाली.

रत्नागिरी येथून व्यापारी अरविंद मोरे यांच्या गाळ्यावर आलेल्या पेटीची खरेदी व्यापारी युवराज काची यांनी केली. सहा डझनाच्या पेटीला 11 हजार 111 रूपये दर मिळाला. आतापर्यंत हवामानाचा कोणताच परिणाम झालेला नाही. त्यामुळे यंदा हापूसचा हंगाम चांगला होणार असल्याचे शेतकरी-व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

याबाबत अरविंद मोरे म्हणाले, दरवर्षी सुमारे फेबु्रवारच्या शेवटच्या आठवड्यात हापूसची आवक वाढण्यास सुरूवात होते. 15 जूनपर्यंत हापूसचा हंगाम सुरू असतो. एप्रिल आणि मे महिन्यात 10 हजार पेट्यांपर्यंत हापूसची आवक होत असते. प्रतवारीनुसार त्यास दर मिळत असतो. यंदा कोकणातील झाडांना फळधारणा चांगली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jorhat Airbase Incident Video : हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, ५ जवान शहीद; दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Pune Nashik High Speed: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ आराखड्यानुसारच; जीएमआरटी अडथळा नसल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष

मोठी बातमी! वैभव सूर्यवंशीला सरावादरम्यान दुखापत; प्रॅक्टिस अर्धवट सोडून बाहेर पडला, श्रीलंका ए विरुद्धचा सामना खेळणार का?

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

Latest Live Updates Marathi: बेरूतवर आज सकाळी झालेला हल्ला व्हायला नको होता - ट्रम्प

SCROLL FOR NEXT