harbhajan singh
harbhajan singh 
पुणे

सिंग इज किंग! कोरोना संकटात भज्जीचा पुणेकरांना मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई हे कोरोनाचे हॉटस्पॉट असून पुणे शहरता 6 हजारांपेक्षा जास्त तर जिल्ह्यात तब्बल 12 हजार 707 नवीन रुग्ण सापडले आहेत.

पुणे - राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून रविवारी दिवसभरात 68 हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यातच राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधक यांच्यात रेमडेसिव्हिरवरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर आणि आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर असताना सुरु असलेल्या राजकारणामुळे जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई हे कोरोनाचे हॉटस्पॉट असून पुणे शहरता 6 हजारांपेक्षा जास्त तर जिल्ह्यात तब्बल 12 हजार 707 नवीन रुग्ण सापडले आहेत. दरम्यान आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्याला भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग मदत करणार असल्याचं सांगितलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, पुण्याची कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहून क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी माझ्याशी संपर्क साधला. दररोज दोन हजारहून अधिक कोरोना चाचण्या होतील, अशी मोबाइल व्हॅन ते पुण्याला पुरविणार आहेत. त्यासाठीचा सर्व खर्च ते करणार आहेत. येत्या आठ ते दहा दिवसात पुण्यामध्ये सुमारे २००० ऑक्सिजन खाटांची व्यवस्था भाजपतर्फे केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने गुन्हा दाखल करावा

केवळ भाजपला श्रेय मिळू नये म्हणून राज्यातील कोरोना रुग्णांना ६० हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनची व्यवस्था होत असतानाही संबंधित पुरवठादारालाच पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. याबाबत राज्य सरकारला गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यांनी तो खुशाल करावा, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले.

भाजपला श्रेय मिळू नये म्हणून हा प्रकार

गुजरातच्या अन्न व औषध प्रशासनाने रेमडेसिव्हिर बाबत आदेश दिले आहेत तसेच आदेश महाराष्ट्रानेही दिले आहेत. वापीतून साठ हजार रेमडेसिव्हिर आणण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी एक पुरवठादार शोधला. मात्र कंपनीने आगाऊ रक्कम देण्याची मागणी केली. दरेकर यांनी राज्याचे अन्न औषध प्रसाधन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना आगाऊ रक्कम देण्याविषयी सांगितले. मात्र, राज्य सरकार आगाऊ रक्कम देत नसल्याचे शिंगणे यांनी सांगितले. तेव्हा तुम्ही आगाऊ रक्कम देणार नसाल, तर आम्ही ही इंजेक्शन खरेदी करतो, असे दरेकरांनी सांगितल्यानंतर तशी परवानगी दिली गेली. मात्र, नंतर या पुरवठादारालाच पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजपला श्रेय मिळू नये, यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप पाटील यांनी केला.

संकटात एकत्र काम करावं ही जनतेची अपेक्षा

राज्यात इंजेक्शन, ऑक्सिजन उपलब्ध नसताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून उद्योजकांना भेटत नाहीत, ते निर्णय घेत नाहीत, काहीही प्रयत्न करत नाही. नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस दोघेही धडाडीने काम करत आहेत. राज्य सरकार मात्र खोटे आरोप करून जनतेला वेडे बनवत आहे. मात्र, संकटकाळात एकत्रित काम करावे, अशी जनतेची अपेक्षा आहे, असे पाटील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT