Harishchandra Thorat
Harishchandra Thorat Sakal
पुणे

अवघ्या आठ वर्षात ८० पदक मिळवणारा 68 वर्षीय तरुण धावपटू

नवनाथ भेके

जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी हरिश्चंद्र थोरात यांची भारतीय संघात निवड.

निरगुडसर - केरळ येथे झालेल्या चौथ्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेमध्ये आंबेगाव तालुक्यातील खडकी फाटा येथील हरिश्चंद्र थोरात यांनी ५ हजार मीटर चालणे, ४x४००मीटर रिले या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक. तसेच, ८०० मीटर धावणे रौप्य पदक, ४०० मीटर धावणे ब्रॉंझपदक अशी एकूण चार पदके पटकावली आहेत. तसेच, जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली आहे. केरळ तिरुअनंतपुरम येथे येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतामधून एकूण तेरा राज्य सहभागी झाले होते. त्यात महाराष्ट्रा ला चॅम्पियनशिप मिळाली. दरम्यान, थोरात यांची जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. निवड झाल्याबद्दल त्यांचे आंबेगाव तालुक्यातून कौतुक होत आहे.

हरिश्चंद्र थोरात यांनी वयाच्या ६० वर्षानंतर रनिंगमध्ये भाग घेऊन ८० मॅरेथॉन स्पर्धा जिंकुन ८० पदके पटकावली आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेमध्ये दैदिप्यमान कामगिरी करत ऑस्ट्रेलिया व मलेशिया या देशातील ३ स्पर्धांमध्ये एक रौप्यपदक व दोन ब्राँझ पदक मिळविले. राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हा स्तरीय सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकं अशी ८० पदक अवघ्या आठ वर्षात मिळवणारा हा 68 वर्षीय तरुण धावपटू म्हणून प्रसिद्ध आहे.

हरिचंद्र थोरात म्हणाले की, वयाच्या ६० वर्षानंतर रनिंगमध्ये भाग घेऊन ८० मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्या असून त्यातून अवघ्या आठ वर्षात ८० पदकांची कमाई केली आहे. स्वखर्चाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धा खेळल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT