Harishchandragad News sakal
पुणे

Harishchandragad News : ट्रेकिंगसाठी गेले ६ जण , रस्ता चुकले अन्...!

Harishchandragad News : सहा तरुण पुण्याहुन हरिश्चंद्रगडावर गेले होते

सकाळ डिजिटल टीम

Harishchandragad News : महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र गडावर एका पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अधिक माहिती अशी कि, बाळू नाथाराम गिते असं या मृत पर्यटकाचे नाव आहे. रस्ता भरकटल्यामुळे बाळूसोबत त्याचे मित्र हरिश्चंद्रगडावर अडकले होते. रात्रभर सतत पडणारा पाऊस आणि थंडीमुळे कुडकुडून या तरुणाचा मृत्यू झाला.

अनिल उर्फ बाळू नाथाराव गिते, अनिल मोहन आंबेकर, गोविंद दत्तात्र्यय आंबेकर, तुकाराम आसाराम तिपाले, महादू जगन भुतेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे हे सहा तरुण पुण्याहुन हरिश्चंद्रगडावर गेले होते.

हे सर्वजण पुण्यातील कोहगाव येथे राहणारे आहेत. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांनी ट्रेकला सुरुवात केली. गडावर चढत असताना धुक्यामुळे ते रस्ता भरकटले.पाऊस आणि थंडीने रात्रभर काकडल्याने या तरुणांची प्रकृती खराब झाली.अनिल उर्फ बाळू गिते या तरुणाची प्रकृती जास्तच बिघडली आणि त्याचा बुधवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला.

वन विभागाला याबाबत माहिती समजताच स्थानिक गावकरी, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने मयत व्यक्तीसह पर्यटकांना गडावरून केले रेस्क्यू. तीन तरुणांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या तरुणांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT